शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
5
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
6
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
7
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
8
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
9
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
10
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
11
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
12
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
13
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
14
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
15
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
16
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
17
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
18
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
19
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
20
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

सेहवागने संघात शांतचित्त, दडपणमुक्त वृत्तीचा संचार केला

By admin | Updated: April 12, 2017 03:33 IST

आयपीएलच्या आणखी एका पर्वाला शानदार सुरुवात झाली. हैदराबादचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम सलामी लढतीदरम्यान खच्चून भरले होते. हे चित्र स्पर्धेच्या

- सौरव गांगुली लिहितो...आयपीएलच्या आणखी एका पर्वाला शानदार सुरुवात झाली. हैदराबादचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम सलामी लढतीदरम्यान खच्चून भरले होते. हे चित्र स्पर्धेच्या लौकिकात भर पाडणारे आहे. २००९च्या जेतेपदाचा अपवाद वगळता त्यावेळच्या डेक्कन चार्जर्सने फारसे यश मिळविले नसल्याने चाहत्यांची संख्या रोडावली होती. पण डेव्हिड वॉर्नर, युवराजसिंग, मोझेस हेन्रिक्स आणि राशीद खान यांंच्या अफलातून कामगिरीमुळे चाहत्यांची संख्या पुन्हा वाढली आहे. खेळाडूंच्या जखमांमुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाची सुरुवातच पराभवाने झाली. अन्य संघांनी मात्र थाटात सुरुवात केली आहे. एबी डिव्हिलियर्सने सोमवारी बहारदार खेळी केली. पण, कोहलीच्या आक्रमक नेतृत्वाला हा संघ मुकल्यामुळे दुसरा पराभव पदरी पडला. सनरायजर्स हैदराबाद, किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्सने मात्र विजयी सुरुवात केली आहे. मुस्तफिजूर रहमानच्या समावेशामुळे हैदराबाद संघ तुल्यबळ जाणवतो आहे. हा संघ आणखी भक्कम होईल. केकेआरदेखील बलाढ्य संघ आहे, पण ख्रिस लीनची दुखापत त्यांच्यासाठी महागडी ठरू शकते. त्यावर व्यवस्थापन तोडगा काढेल, अशी आशा आहे.पंजाब संघाच्या कामगिरीत नेहमी चढ-उतार जाणवायचा. गेल्या मोसमात हा संघ पात्रता फेरीही गाठू शकला नव्हता. यंदा त्यांची विजयी घोडदौड सुरू झाली. त्यांचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेल जबर फॉर्ममध्ये आहे. तो आघाडीवर असेल तर काहीही शक्य आहे. कुणावरही विजय कठीण नसेल. वीरेंद्र सेहवागसारख्या मेंटरमुळे या संघात मोठा फरक जाणवत आहे. सेहवागने संघात शांतचित्त आणि दडपणमुक्त वृत्ती या दोन्ही बाबींचा संचार केला. सेहवाग खेळायचा तेव्हा या दोन्ही गोष्टी त्याच्या खेळात सतत जाणवत असायच्या. टी-२० सारख्या प्रकारात खेळताना या दोन्ही गोष्टींना फार महत्त्व असते. (गेमप्लान)