शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून बधिर आॅलिम्पिकपटूंना सापत्न वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:24 IST

देशासाठी सुवर्णासह पाच पदके जिंकणा-या बधिर आॅलिम्पिकपटूंना सरकारने सापत्न वागणूक दिली. त्या निषेधार्थ खेळाडूंनी विमानतळावरच धरणे देत सापत्न वागणुकीचा निषेध केला.

नवी दिल्ली : देशासाठी सुवर्णासह पाच पदके जिंकणा-या बधिर आॅलिम्पिकपटूंना सरकारने सापत्न वागणूक दिली. त्या निषेधार्थ खेळाडूंनी विमानतळावरच धरणे देत सापत्न वागणुकीचा निषेध केला. पॅरा अ‍ॅथलिट्सप्रमाणे आम्हालादेखील सन्मान मिळावा, अशी पदकविजेत्यांची मागणी आहे. या खेळाडूंच्या स्वागतासाठी क्रीडा मंत्रालयाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता, हे विशेष.१८ ते ३० जुलै या काळात तुर्कस्तानातील सॅमसून येथे झालेल्या बधिरांच्या आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी एका सुवर्णासह पाच पदके जिंकली. मायदेशात हे खेळाडू दाखल झाले तेव्हा मात्र स्वागतसाठी कुणीही हजर नसल्याने, या खेळाडूंनी नवी दिल्ली विमानतळ सोडण्यास नकार देत तेथेच धरणे आंदोलन केले. नंतर क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास यांची भेट घेत या खेळाडूंनी मागण्या सादर केल्या. बधिर खेळाडूंना पॅरा अ‍ॅथलिट्ससारखी वागणूक मिळायला हवी, अशी त्यांची मागणी होती. वीरेंद्र कुमार याने ७४ किलो फ्री स्टाइल कुस्तीचे सुवर्ण जिंकले.त्याचे कोच महासिंग राव म्हणाले, ‘श्रीनिवास यांनी हे प्रकरण मंत्रालयासमक्ष ठेवण्याची हमी दिली आहे.’ गुरू हनुमान आखाड्याचे प्रशिक्षक राव पुढे म्हणाले, ‘क्रीडा सचिवांनी आमची व्यथा जाणून घेतली. हा मुद्दा क्रीडा मंत्रालयाच्या समितीपुढे ठेवण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. याशिवाय बधिर खेळाडूंना साईतील सुविधांचा वापर करण्यास परवानगी मिळावी, अर्जुन पुरस्कारासाठी बधिर खेळाडूंच्या नावाची शिफारस व्हावी आणि या खेळाडूंना आर्थिक प्रोत्साहन रक्कम मिळावी या मागण्यादेखील मांडण्यात आल्या. वीरेंद्र कुमार याला आधीच अर्जुन पुरस्कार मिळाला असल्याने, तो अन्य एका बधिर मल्लाची या पुरस्कारासाठी शिफारस करू इच्छितो.’ (वृत्तसंस्था)