शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मोहितच्या विश्वविक्रमी खेळीचे रहस्य... छोटे मैदान

By admin | Updated: February 8, 2017 23:50 IST

दिल्लीचा क्रिकेटपटू मोहित अहलावत याने टी-२० क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावून नवा विक्रम नोंदविला. टी-२० क्रिकेटमधील कुठल्याही स्तरावर असा भीमपराक्रम

नवी दिल्ली : दिल्लीचा क्रिकेटपटू मोहित अहलावत याने टी-२० क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावून नवा विक्रम नोंदविला. टी-२० क्रिकेटमधील कुठल्याही स्तरावर असा भीमपराक्रम करणारा मोहित जागतिक क्रिकेटमध्ये पहिलाच खेळाडू ठरला. केवळ ७२ चेंडूंत ३९ षटकार आणि १४ चौकारांसह ३०० धावा ठोकणाऱ्या यशाचे रहस्य छोट्या मैदानात दडले होते, हे सत्य आता पुढे आले.नवी दिल्लीतील ललिता पार्क मैदानावर फ्रेन्ड्स प्रीमियर लीगमध्ये मावी इलेव्हन आणि फ्रेन्ड्स इलेव्हन यांच्यातील सामन्यादरम्यान मोहितने हा विक्रम केला. मात्र त्याने ज्या मैदानावर ही विक्रमी खेळी केली ते मैदान आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी असलेल्या मैदानांच्या तुलनेत अगदीच छोटे होते. मैदान लहान असल्यामुळे मोहितला हा विक्रम करता आला. मोहितने ज्या मैदानावर ही कामगिरी केली त्या मैदानाची सीमारेषा केवळ ४० यार्ड इतकीच आहे.आंतरराष्ट्रीय सामने ज्या मैदानावर खेळविले जातात त्या मैदानावर सीमारेषा साधारणत: ६५ ते ७० यार्ड इतक्या अंतरावर असते. जगातील अनेक मैदानांवरील सीमारेषा ७५ यार्डदेखील आहे. मोहितचा झंझावात मात्र नजरेआड करण्यासारखा नाही. (वृत्तसंस्था) सामन्यात इतर खेळाडूंना जी कामगिरी करता आली नाही, ते मोहितने करून दाखविले हे विशेष.