शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रो कबड्डीची दुसरी ‘एन्ट्री’ दिमाखात

By admin | Updated: July 17, 2015 02:45 IST

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला शनिवार पासून दिमाखात सुरुवात होईल. तत्पूर्वी गुरुवारी मुंबईतील लोअर परेल येथे एका शानदार

मुंबई : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला शनिवार पासून दिमाखात सुरुवात होईल. तत्पूर्वी गुरुवारी मुंबईतील लोअर परेल येथे एका शानदार कार्यक्रममध्ये स्पर्धेतील सहभागी आठ संघाच्या खेळाडूंच्या उपस्थितीत प्रो कबड्डीच्या चषकाचे अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर यावेळी आयोजकांनी यंदाच्या सत्रात स्पर्धेतील काही बदलांची माहिती देऊन यंदाची प्रो कबड्डी कबड्डीचाहत्यांना नक्की खिळवून ठेवेल असा विश्वासही व्यक्त केला. दखल घेण्याची बाब म्हणजे स्पर्धेच्या पहिल्या सामन्याआधी बॉलिवूडचे शेहनशहा बिग बी अमिताभ बच्चन स्वत: राष्ट्रगीत गाणार असल्याची माहिती देखील आयोजकांनी दिली.प्रो कबड्डीला पहिल्या सत्रात मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर सर्वांच्या नजरा १८ जुलै पासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या सत्राकडे लागले आहेत. यंदा स्पर्धेत प्रत्येक संघामध्ये खेळाडूंची संख्या वाढल्याने स्पर्धा पहिल्यापेक्षा जास्त चुरशीची होईल असे आयोजकांनी सांगितले. गतवर्षी प्रत्येक संघामध्ये १४ खेळाडू होते आणि यंदा हीच संख्या २५ वर गेली आहे. त्याचबरोबर यंदा प्रत्येक सामन्यावेळी स्पेशल इफेक्ट्सच्या मदतीने ग्राफीक्स आणि अ‍ॅनिमेशनच्या जोरावर प्रो कबड्डी आणखी आकर्षक होणार असल्याचे देखील आयोजकांनी सांगितले. दरम्यान यावेळी स्पर्धेच्या ट्रॉफीमध्ये देखील बदल करण्यात आले. सहभागी आठ संघाचे कर्णधार व खेळाडूंच्या उपस्थितीत ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. शिवाय प्रत्येक खेळाडूंनी आपापल्या संघाच्या तयारीबाबत माहिती देऊन विजेतेपद पटकावण्याचा निर्धार देखील केला. ‘बिग बी’ गाणार राष्ट्रगीत..याआधीच अमिताभ बच्चन यांनी गायलेले प्रो कबड्डी थीम साँग गाजत असतानाच, कबड्डी चाहत्यांना आणखी एक सरप्राई मिळणार आहे. यंदाच्या सत्रातील सलामीच्या सामन्याआधी खुद्द बिग बी राष्ट्रगीत गाणार आहेत.