शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भरत अरुणच्या नियुक्तीवर सौरव गांगुलीने बाळगले मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 15:42 IST

भरत अरुण यांच्या करण्यात आलेल्या निवडीबाबत प्रतिक्रिया विचारली असता सौरव गांगुलीने मौन पाळणे पसंत केले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - सौरव गांगुली आणि रवी शास्त्रीमध्ये सुरू असलेल्या शितयुद्धात रवी शास्त्रीने आणलेल्या दबावासमोर झुकत बीसीसीआयने काल भरत अरुण यांची संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी वर्णी लावली होती. भरत अरुण यांच्या करण्यात आलेल्या निवडीबाबत प्रतिक्रिया विचारली असता सौरव गांगुलीने मौन पाळणे पसंत केले. 
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने केलेली शिफारस डावलून बीसीसीआयने भरत अरुण यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमले होते. भरत अरुण यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा पाठिंबा होता. दरम्यान गांगुलीकडे याबाबत विचारणा करण्यात आली असता तो म्हणाला, "याविषयी बरेच काही बोलून झाले आहे. आता मला याविषयी अजून काही बोलायचे नाही."
काही दिवसांपूर्वी क्रिकेट सल्लागार समितीने रवी शास्त्री यांची भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक, झहीर खानला गोलंदाजी प्रशिक्षक आणि राहुल द्रविडला फलंदाजी प्रशिक्षक बनवण्याची शिफारस केली होती. त्यानंतर झहीर खान वर्षातील 150 दिवस भारतीय संघाला मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले होते. पण बीसीसीआयने या दोघांच्याही नियुक्तीला स्थगिती दिली होती. भरताच्या या दोन माजी क्रिकेटपटूंच्या भवितव्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे बीसीसीआय सचिव अमिताभ चौधरी यांनी सांगितले होते.  अधिक वाचा
(रवी शास्त्रींचा दबदबा ! भरत अरूण टीम इंडियाचे नवे बॉलिंग कोच )(हा तर द्रविड आणि झहीरचा सार्वजनिक अपमान - रामचंद्र गुहा )( झहीरसोबत वर्षाकाठी १५० दिवसांचा करार - गांगुली )नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची मागणी मान्य करताना बीसीसीआयने मंगळवारी भरत अरुण यांची भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर केली होती. त्यामुळे या पदाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. शास्त्री भारतीय संघाचे संचालक होते त्या वेळी अरुण गोलंदाजी प्रशिक्षक होते. त्यांनी लवकरच सुरू होत असलेल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी अरुण यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्याचा आग्रह धरला होता.  
अरुण यांना दोन वर्षांसाठी करारबद्ध करण्याचा निर्णय शास्त्री यांच्या प्रशासकांची समिती (सीओए) तसेच काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना आणि सचिव अमिताभ चौधरी यांच्यासह बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबतच्या मुलाखतीनंतर घेण्यात आला.