शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

साऊदीने केला इंग्लंडचा ‘सफाया’

By admin | Updated: February 21, 2015 02:24 IST

ब्रेंडन मॅक्युलम याने अवघ्या १८ चेंडूंत विक्रमी अर्धशतक झळकवित न्यूझीलंडला विश्वचषकाच्या अ गटात शुक्रवारी झटपट आठ गड्यांनी विजय मिळवून दिला.

न्यूझीलंडचा ८ गड्यांनी विजय : टीम साऊदीचे सात बळी, मॅक्युलमचे जलद अर्धशतकवेलिंग्टन : वेगवान गोलंदाज टीम साऊदीने सात बळी घेत इंग्लंडचे कंबरडे मोडल्यानंतर ब्रेंडन मॅक्युलम याने अवघ्या १८ चेंडूंत विक्रमी अर्धशतक झळकवित न्यूझीलंडला विश्वचषकाच्या अ गटात शुक्रवारी झटपट आठ गड्यांनी विजय मिळवून दिला.साऊदीच्या सात बळींमुळे न्यूझीलंडने इंग्लंडला ३३.२ षटकांत अवघ्या १२३ धावांत रोखले. प्रत्युत्तरात १२.२ षटकांत केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात विजयावर शिक्कामोर्तब केले. मॅक्युलमने २५ चेंडूंत ७७ धावा केल्या. त्यात १८ चेंडूंवर अर्धशतक ठोकून विश्वचषकात नवा विक्रम नोंदविला. त्याने आठ चौकार आणि सात षटकार मारले. २००७ मध्ये विंडीजमध्ये झालेल्या विश्वचषकात मॅक्युलमने कॅनडाविरुद्ध २० चेंडूंवर अर्धशतक नोंदविले होते. तो विक्रम मागे टाकला. याआधी द. आफ्रिकेचा डिव्हिलियर्स याने १६ व सनथ जयसूर्याने १७ चेंडूंवर अर्धशतक पूर्ण केले होते.मॅक्युलम पहिल्या चेंडूपासून तुटून पडला. स्टीव्हन फिनच्या दोन षटकांत त्याने ४९ धावा वसूल केल्या. संपूर्ण खेळीत त्याच्या केवळ तीन एकेरी धावा होत्या. उर्वरित धावा चौकार-षटकारांनी पूर्ण झाल्या. त्याआधी साऊदी विश्वचषकात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज बनला. त्याने नऊ षटकांत ३३ धावा देत सात गडी बाद केले. इंग्लंडचा कर्णधार इयान मोर्गन याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पाच षटकांच्या पहिल्या स्पेलमध्ये दोन गडी बाद करणाऱ्या साऊदीच्या माऱ्यापुढे इंग्लिश फलंदाजांनी गुडघे टेकले. ट्रेंट बोल्ट, व्हेट्टोरी आणि मिल्ने यांनी एकेक गडी बाद केला. इंग्लंडकडून ज्यो रुट अपवाद ठरला. त्याने सर्वाधिक ४६ व सलामीचा मोईन अली याने २० धावा केल्या. इंग्लंडच्या एकवेळ ३ बाद १०३ धावा होत्या. त्यानंतर पत्त्यासारखा डाव कोसळून १९ धावांत अखेरचे सात गडी बाद झाले. (वृत्तसंस्था)अनपेक्षित विजयावरमॅक्युलम आश्चर्यचकित४विश्वचषकात इंग्लंडवर मिळविलेल्या एकतर्फी विजयावर न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम स्वत: आश्चर्यचकित आहे. हा अनपेक्षित विजय असल्याचे त्याचे मत आहे. ‘‘हा देखणा विजय आहे. इंग्लंड संघ अक्षरश: झुंजत राहिला. चेंडू इतके स्विंग झाले, की प्रतिस्पर्धी फलंदाजांना त्यातून सावरता आले नाही.’’ असे मॅक्युलम म्हणाला.साऊदीची सर्वोत्कृष्ट कामगिरी४१८ धावा देत सात बळी घेणारा टीम साऊदी विश्वचषकात अशी कामगिरी करणारा देशाचा पहिला गोलंदाज ठरला. सध्या कोच असलेल्या शेन बॉण्ड याला त्याने मागे टाकले. ४२००५ मध्ये बुलावायो येथे बॉण्डने भारताचे १९ धावांत सहा बळी घेतले होते. विश्वचषकात याआधी आॅस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा याने १५ धावांत सात आणि आॅस्ट्रेलियाच्याच अ‍ॅण्डी बिकल याने २० धावांत सात गडी बाद केले आहेत.18 : न्यूझीलडंचा विस्फोटक फलंदाज ब्रँडन मॅक्युलमने विश्वचषक स्पर्धेत १८ चेंडूंत अर्धशतक झळकाविण्याचा पराक्रम केला. यापूर्वी एकदिवसीय क्रिकटमध्ये एबी डिव्हिलियर्स याने १६ चेंडूंत अर्धशतक केले आहे. १२३: इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर विश्वचषक स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या. 0७ : टीम साऊदी आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडचे ७ गडी तंबूत पाठवून न्यूझीलंडकडून विक्रमी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. पूर्वी न्यूझीलंडकडून तीन वेळा ६ विकेट घेतल्या गेल्या आहेत. त्यात दोन वेळा त्यांच्या शेन बॉन्डने ३ विकेट घेण्याची कामगिरी केली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सात विकेट घेण्याची ही नववी वेळ आहे. ३0८: ब्रॅन्डन मॅक्युलमने २५ चेंडूंत ७७ धावा केल्या तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट ३०८ होता. एकदिवसीयमध्ये ५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्यांमध्ये हा दुसरा सर्वोच्च स्ट्राईक रेट आहे. २२६: न्यूझीलंड संघाने जेव्हा १२४ धावांचे टार्गेट पूर्ण केले तेव्हा २२६ चेंडू बाकी होते. न्यूझीलंड संघाने आपला विजय १२.२ षटकांत साजरा केला. ६.४ : न्यूझीलंड संघाने आपल्या संघाचे शतक ६.४ षटकांत फलकावर लावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २००१ नंतर ही सर्वात जलद खेळी आहे. जलद ५० धावा करण्याचा विक्रमसुद्धा न्यूझीलंडच्या नावावर आहे. २००७ मध्ये त्यांनी बांगलादेशविरुद्ध ३.३ षटकांत ५० धावा कुटल्या होत्या. ४इंग्लंड : इयान बेल त्रि. गो. साऊदी ८, मोईन अली त्रि. गो. साऊदी २०, गॅरी बॅलन्स झे. विल्यम्सन गो. बोल्ट १०, ज्यो रुट झे. व्हेट्टोरी गो. मिल्ने ४६, इयान मॉर्गन झे. मिल्ने गो. व्हेट्टोरी १७, जेम्स टेलर त्रि. गो. साऊदी ००, जोस बटलर झे. रोंची गो. साऊदी ३, ख्रिस वोक्स त्रि. गो. साऊदी १, स्टुअर्ट ब्रॉड झे. व्हेट्टोरी गो. साऊदी ४, स्टीव्हन फिन झे. टेलर गो. साऊदी ००, जेम्स अ‍ॅण्डरसन नाबाद १, अवांतर : १३, एकूण : ३३.२ षटकांत १२३ धावा. गडी बाद क्रम : १/१८, २/३६, ३/५७, ४/१०४, ५/१०४, ६/१०८, ७/११०, ८/११६, ९/११७, १०/१२३. गोलंदाजी : साऊदी ९-०-३३-७, बोल्ट १०-२-३२-१, मिल्ने ५.२-१-२५-१, व्हेट्टोरी ७-०-१९-१,अ‍ॅण्डरसन २-०-८-०. ४न्यूझीलंड : मार्टिन गुप्तिल त्रि. गो. वोक्स २२, ब्रँडन मॅक्युलम त्रि. गो. वोक्स ७७, केन विल्यम्सन नाबाद ९, रॉस टेलर नाबाद ५, अवांतर : १२, एकूण : १२.२ षटकांत २ बाद १२५ धावा. गडी बाद क्रम : १/१०५, २/११२. गोलंदाजी : अ‍ॅण्डरसन ५-०-३७-०, ब्रॉड २.२-०-२७-०, फिन २-०-४९-०, वोक्स ३-१-८-२.