गोल्ड कोस्ट : भारताचा नेमबाजपटू सत्येंद्र सिंग आणि संजीव राजपूतने राष्टÑकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर राईफल थ्री पोजिशन प्रकारात अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकून शेवट गोड केला. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत सहा सुवर्ण, प्रत्येकी सात रौप्य आणि कांस्य अशी एकूण २० पदके आपल्या नावावर केली.स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताच्या चैन सिंगने थ्री पोजिशन प्रकारात अंतिम आठमध्ये स्वत:चे स्थान संपादन केले होते. सत्येंद्रने ११६२ गुणांसह पात्रता फेरीत दुसºया क्रमांकावर राहूनसुद्धा अंतिम फेरीसाठी आपली जागा निश्चित केली. राजपूतने ११५८ गुणांसह तिसरा क्रमांक संपादन केला. चैन सिंगला याच गुणांसह चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सत्येंद्रने अंतिम फेरीत अजून नेम साधून जोरदार सुरुवात केली आणि राजपूत ४५ शॉटपर्यंत चांगलीच टक्कर देत होता. सत्येंद्रने शेवटी अचूक नेम साधत ४५४.२ गुण संपादन करून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. राजपूतला ४५३.३ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चैन सिंग अंतिम फेरीत सुरुवातीला तिसºया क्रमांकावर होता, या वेळी भारतीय नेमबाज तिनही पदके जिंकतील, असे वाटत असतानाच आॅस्ट्रेलियाच्या डेन सॅम्पसनने चैन सिंगला मागे टाकत कांस्यपदक संपादन केले.पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करणारा सोढी एकमेव भारतीय खेळाडू होता. त्याला १२५ पैकी ११८ गुण संपादन करून पाचव्या क्रमांकावर राहावे लागले.
सत्येंद्रला सुवर्ण, तर संजीव राजपूतला रौप्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 04:10 IST