नवी दिल्ली : भारताची लांब पल्ल्याची धावपटू संजीवनी जाधवला डोपिंगप्रकरणी दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. अखिल भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या (एआयएफएफ) अॅथलेटिक्स इंटेग्रिटी पथकाने (एआययू) गुरुवारी कारवाई केली.मूळची नाशिकची असलेल्या २३ वर्षांच्या संजीवनीने २०१९ च्या आशियाई चॅम्पियनशिपच्या दहा हजार मीटर शर्यतीचे कांस्य जिंकले होते. त्याआधी २०१७ मध्ये तिने 5 हजार मीटरमध्ये कांस्य जिंकले होते.एआययूने दिलेल्या निर्णयात संजीवनी पहिल्यांदा दोषी आढळल्याने शिक्षेची तरतूद सौम्य स्वरुपाची आहे. २९ जून २०१८ पासून सर्व प्रकारच्या स्पर्धेतील तिची कामगिरी आणि निकाल रद्द करण्यात आले आहेत. तिच्या निलंबनाचा कालावधी २९ जून २०१८ पासूनच लागू झाला. (वृत्तसंस्था)
संजीवनी जाधव दोन वर्षांसाठी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 04:13 IST