भारताचे नववे स्थान कायम : बजरंग, सनम-साकेतला रौप्य; जैशा, नवीनकुमार, दिवीज-भांबरी यांना कांस्य
इंचियोन : भारताची स्टार सानिया मिङर व साकेत माइनेनी यांनी मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकाविले तर सीमा पुनियाने थाळीफेकमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताने 17 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दहाव्या दिवशी पदकतालिकेत नववे स्थान कायम राखले. याआधी, कुस्तीमध्ये बजरंग, टेनिसमध्ये साकेत माइनेनी व सनम सिंग यांनी रौप्यपदक पटकाविले. अॅथ्लेटिक्समध्ये ओ.पी. जैशा (महिला 15क्क् मीटर दौड) आणि नवीन कुमार (पुरुष 3क्क्क् मीटर स्टिपलचेस) व मल्ल नरसिंग यादव (74 किलो) यांनी कांस्यपदकाचा मान मिळविला.
सीमा पूनियाने महिला थाळीफेक स्पर्धेत 61.क्3 मीटरचे अंतर गाठताना भारताला 17 व्या आशियाई स्पर्धेत सोमवारी अॅथलेटिक्समध्ये पहिले तर एकूण पाचवे सुवर्णपदक मिळवून दिले. सीमाने चौथ्या प्रयत्नात 61.क्3 मीटरचे अंतर गाठले. चीनच्या जियाओजिन लू (59.35 मीटर) रौप्य तर चीनची ही जियान तान (59.क्3 मीटर) कांस्यपदकाची मानकरी ठरली. भारताच्या कृष्णा पूनियाला 55.57 मीटर अंतरासह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. याआधी, महिलांच्या 15क्क् मीटर दौड स्पर्धेत ओ. पी. जैशाने कांस्यपदकाचा मान मिळविला. जैशाने हे अंतर 4 मिनिट 13.46 सेकंद वेळेत पूर्ण केले. बहरिनची युसूफ ईसा (4 मिनिट क्9.9क् सेकंद) सुवर्णपदकाची मानकरी ठरली. सीमाने ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत थाळीफेकमध्ये रौप्यपदक पटकाविले होते. आशियाई स्पर्धेत तिने सुवर्णाची कमाई केली. सीमाने 2क्1क् च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य, तर 2क्क्6 च्या मेलबोर्न राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले होते. 31 वर्षीय सीमाने पहिल्या प्रयत्नात 55.76 मीटर अंतर गाठले. दुस:या प्रयत्नात 57 मीटर तर तिस:या प्रयत्नात 59.36 मीटर अंतर गाठले. चौथ्या थ्रोमध्ये सीमाने 61.क्3 मीटर थाळीफेक केली. सीमाचा पाचवा प्रयत्न फाऊल ठरला, तर सहाव्या प्रयत्नात तिला 58.78 मीटरचे अंतर गाठता आले. चौथ्या थ्रोमध्ये सीमा भारतीय अॅथलेटिक्सची ‘गोल्डन गर्ल’ ठरली. दरम्यान, महिलांच्या 15क्क् मीटर दौड स्पर्धेत ओ. पी. जैशाने 4 मिनिट 13.46 सेकंद वेळेसह कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेत भारताची सिनी मार्कोस (4 मिनिट 17.12 सेकंद) पाचव्या स्थानी राहिली. महिलांच्या लांब उडी स्पर्धेत एम. प्रजुषा व मयुखा जानी यांची कामगिरी निराशाजनक ठरली. प्रजुषाला (6.23 मीटर) आठव्या, तर मयुखाला (6.12 मीटर) नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. इंडोनेशियाच्या मारिया नतालियाने 6.55 मीटर लांब उडी घेत सुवर्णपदकावर नाव कोरले.
टेनिसपटूंना रौप्य
भारतीय टेनिसपटू सनम व साकेत यांना पुरुष दुहेरीमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सनम-साकेत जोडीला कोरियाच्या योंगकियू लिम व कियून चुंग यांच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. पाचव्या मानांकित भारतीय जोडीचा आठव्या मानांकित स्थानिक जोडीने 7-5, 7-6 ने पराभव केला.
भारताची थायलंडवर 66-27 ने मात
भारतीय कबड्डी संघाने फॉर्म कायम राखताना थायलंडचा 66-27 ने पराभव करीत या स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदविला. आजतागायत पाच वेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळविणा:या भारतीय पुरुष संघाने मध्यंतरार्पयत 29-15 अशी आघाडी मिळविली होती. दुस:या सत्रत भारतीय संघाने 37-12 अशी आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. महिला संघाला मंगळवारी साखळीतील शेवटच्या लढतीत कोरियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. महिला संघाने सलामी लढतीत बांगलादेशचा पराभव केला होता.
टेबल टेनिस : अमलराज, मुधरिका, अंकिता विजयी
इंचियोन : आशियाई स्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये अँथोनी अमलराज, मधुरिका पाटकर, अंकिता दास यांनी पहिल्या फेरीच्या लढतीत प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून पुढच्या फेरीत प्रवेश केला़ स्पर्धेत भारताच्या अँथोनी अमलराज आणि मधुरिका पाटकर यांनी मिश्र दुहेरीत राऊंड ऑफ 32 मध्ये मंगोलियाच्या ओर्गिल मुन्ख आणि एन्खजिन बरखास या जोडीवर अवघ्या 16 मिनिटांच्या लढतीत 12-1क्, 11-3, 11-6 अशी धूळ चारताना पुढच्या फेरीत प्रवेश निश्चित केला़ महिला एकेरीतील सामन्यात अंकिता दास हिने कुवेतच्या अल्शामारी मेनवाह हिच्यावर 19 मिनिटांर्पयत रंगलेल्या लढतीत 11-4, 11-9, 11-3, 11-9 ने सरशी साधत दुस:या फेरीत प्रवेश नोंदविला, तर पोलोमी घातक आणि अंकिता यांनी महिला दुहेरीच्या सामन्यांत राऊंड 32 मध्ये पाकिस्तानच्या राहिला कशिफ आणि शबनम बिलालचा 11-5, 11-1, 11-7 असा पराभव करताना राऊंड ऑफमध्ये जागा मिळविली़ महिला दुहेरीच्या सामन्यात मधुरिका पाटकर आणि नेहा अग्रवाल यांनी मालदीवच्या ऐसात निसा आणि अमीनाय शरीफ या जोडीवर 11-3, 22-6, 11-1 असा सहज विजय मिळवीत स्पर्धेत आगेकूच केली़
पाच पदके मिळविणो मोठे यश : सानिया
इंचियोन : आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिसमध्ये पाच पदके मिळविणो हे भारताचे खूप मोठे यश असल्याचे मत भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिङर हिने व्यक्त केले आह़े विशेष म्हणजे भारताच्या आघाडीच्या खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेतली होती़ त्यामुळे युवा खेळाडूंनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे, असेही ती म्हणाली़
सानिया म्हणाली, की मी प्रार्थनासह महिला दुहेरीत कांस्यपदक मिळवू शकले, याचा आनंद आह़े यापूर्वी आम्ही स्पर्धेत अशी कामगिरी केलेली नाही़
विशेष म्हणजे आम्ही या स्पर्धेत युवा खेळाडूंसह येथे पोहोचलो होतो़ त्यामुळे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणो आमच्यासमोर आव्हान होत़े त्यानंतर टेनिसमध्ये 5 पदके मिळाली, हे आमचे खूप मोठे यश आह़े
सानियाने डब्ल्यूटीए टूरवर दुहेरीत गुण मिळविण्यासाठी आशियाई स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता; मात्र त्यानंतर तिने या स्पर्धेत सहभाग घेण्याचा निर्णय घेतला़ याबद्दल ती म्हणाली, की मी आशियाई स्पर्धेत सहभाग घेण्याचा योग्य निर्णय घेतला़
यानंतर स्पर्धेत जास्तीत जास्त पदके मिळविण्याचे आमच्यासमोर आव्हान होत़े हे आव्हान युवा खेळाडूंच्या बळावर आम्ही यशस्वीरीत्या पेलल़े (वृत्तसंस्था)
दुहेरीतील अव्वल खेळाडू सानिया मिङर व साकेत मिनेनी यांनी मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकाविले. भारताला 17 व्या आशियाई स्पर्धेत हे सहावे सुवर्णपदक ठरले. सानिया व साकेत या दुस:या मानांकित जोडीने सिएन यिन पेंग व हाओ चिंग चान या जोडीचा 6-4, 6-3 ने पराभव करीत सुवर्णपदक पटकाविले. साकेतने टेनिसमध्ये भारताला दुहेरी यश मिळवून दिले. यापूर्वी साकेतने सनम सिंगच्या साथीने पुरुष दुहेरीत रौप्यपदकाचा मान मिळविला. भारतीय जोडीला द. कोरियाच्या जोडीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.