शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

टेनिसमध्ये सानिया, रोहणकडून पदकाची अपेक्षा

By admin | Updated: August 5, 2016 20:21 IST

रिओ आॅलिम्पिकपूर्वी लियांडर पेसबाबत झालेल्या वादामुळे भारतीय टेनिस चर्चेत राहिले. पण या खेळात रिओमध्ये सानिया मिर्झा- रोहण बोपन्ना यांच्या मिश्र दुहेरी जोडीकडून पदकाची अपेक्षा आहे.

ऑनलाइन लोकमतरिओ, दि. ५ : रिओ आॅलिम्पिकपूर्वी लियांडर पेसबाबत झालेल्या वादामुळे भारतीय टेनिस चर्चेत राहिले. पण या खेळात रिओमध्ये सानिया मिर्झा- रोहण बोपन्ना यांच्या मिश्र दुहेरी जोडीकडून पदकाची अपेक्षा आहे. लंडन आॅलिम्पिकआधीअसेच मानापमान नाट्य गाजले. रिओपूर्वी त्याची पुनरावृती झाली. पेस आणि त्याचा दुहेरीचा जोडीदार बोपन्ना यांच्यातील मतभेद बरेच गाजले.बोपन्नाने आधी पेस नव्हे तर साकेत मिनेनी याच्यासोबत खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण अ.भा. टेनिस महासंघाने वेळीच दखल घेत दोघांमध्ये समेट घडवून आणला. पेसने क्रीडाग्राममध्ये बोपन्नासोबत एका खोलीत थांबण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. सलग सातवे आॅलिम्पिक खेळत असलेला पेस गुरुवारी येथे दाखल झाला. त्याच्यासाठी कुठलीच खोली नव्हती. नंतरत्याला खोली उपलब्ध करून देण्यात आली. पथकप्रमुख राकेश गुप्ता यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण देताना सांगितले की, पेस एकटाच थांबणार होता.

कुठलाही वाद नाही. ज्येष्ठ खेळाडू या नात्याने वेगळी खोली त्याला मिळायलाच हवी. पेस उशिरा पोहोचल्यामुळे बोपन्नाने सर्बियाचा नेनाद जिमोजिच याच्यासोबत सराव केला. नंतर त्याने सानिया मिर्झा आणि प्रार्थना ठोंबरे यांच्यासोबतही सरावाचा आनंद लुटला.भारतासाठी पेसने अटलांटा आॅलिम्पिकमध्ये १९९६ मध्ये कांस्य जिंकले होते. तेव्हापासून या खेळात भारताच्या पदकांची झोळी रिकामीच आहे. पेस- बोपन्ना यांचा पहिल्या फेरीत सामना पोलंडची जोडी मार्टिन मॅटकोव्हस्की- लुकास कुबोट यांच्याविरुद्ध होईल. पेस दुहेरी क्रमवारीत ५० च्या खाली घसरला आहे. भारताला दुहेरीत येथे १५ वे रँकिंग मिळाले. मिश्र प्रकारात भारताला पदकाची आशा आहे. महिला दुहेरीत सानिया- प्रार्थना यांना सलामीला चीनची जोडी पेंग शुआइ- शुआइ झांग यांच्याविरुद्ध लढत द्यायची आहे.