शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सानिया ‘खेलरत्न’ची दावेदार!

By admin | Updated: July 19, 2015 00:37 IST

जागतिक क्रमवारीतील दुहेरीची नंबर वन खेळाडू, विम्बल्डन महिला दुहेरी चॅम्पियन टेनिसस्टार सानिया मिर्झा ही यंदा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने

नवी दिल्ली : जागतिक क्रमवारीतील दुहेरीची नंबर वन खेळाडू, विम्बल्डन महिला दुहेरी चॅम्पियन टेनिसस्टार सानिया मिर्झा ही यंदा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित होऊ शकते. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची सानियाच्या नावाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याची योजना आहे. खेलरत्न पुरस्कार दर वर्षी २९ आॅगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रपती अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांसोबत प्रदान करतात. गतवर्षी एकाही खेळाडूला खेलरत्न पुरस्कार देण्यात आला नव्हता.सानिया मिर्झाने केलेल्या शानदार कामगिरीमुळे तिला खेलरत्न पुरस्कार देण्याचा क्रीडा मंत्रालय गांभीर्याने विचार करीत आहे. प्राप्त माहितीनुसार, ९ खेळाडूंनी खेलरत्न पुरस्कारासाठी अर्ज केला आहे. त्यांत दीपिका पल्लीकल (स्क्वॅश), सीमा अंतिल (डिस्कस थ्रो), विकास गौडा (डिस्कस थ्रो), सरदारसिंग (हॉकी), टिंटू लुका (अ‍ॅथलेटिक्स), अभिषेक वर्मा (धनुर्विद्या), गिरीशा एच. एन. (पॅरालिम्पियन हायजंपर), पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटन) आणि जीव मिल्खासिंग (गोल्फ) यांचा समावेश आहे. सानियाला २००४मध्ये अर्जुन पुरस्कार आणि २००६मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. तिने गतवर्षी आशियाई क्रीडास्पर्धेत साकेत मिनेनी याच्या साथीने मिश्र दुहेरीत सुवर्ण आणि प्रार्थना ठोंबरे हिच्या साथीने महिला दुहेरीत कांस्यपदक जिंकले.हैदराबादच्या सानियाने गतवर्षी यूएस ओपनमध्ये ब्राझीलच्या ब्रूनो सोरेस याच्या साथीने मिश्र दुहेरीत अजिंक्यपद पटकावले होते. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रत्येक वर्षी एकाच खेळाडूला दिला जातो. २००८मध्ये महिला बॉक्सर एम. सी. मेरी कोम आणि मुष्टियोद्धा विजेंदरसिंह व पैलवान सुशीलकुमार, तसेच २०१२मध्ये योगेश्वर दत्त यांना खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. हिंगीसची साथसानिया या वर्षी एप्रिलमध्ये जागतिक क्रमवारीत दुहेरीची नंबर वन खेळाडू बनली आहे. सध्या ती स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीससोबत महिला दुहेरीत खेळते. हिंगीसच्याच साथीने विम्बल्डनचे महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. सानियाने वैयक्तिक पातळीवर खेलरत्न पुरस्कारासाठी अर्ज केला नाही.