शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

सानिया-हिंगीस उपांत्य फेरीत; बोपन्ना-मर्जिया पराभूत

By admin | Updated: July 10, 2015 01:47 IST

भारताची अव्वल टेनिस तारका सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी जबरदस्त कामगिरी करताना या वर्षातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन

लंडन : भारताची अव्वल टेनिस तारका सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी जबरदस्त कामगिरी करताना या वर्षातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. दरम्यान भारताचा दुहेरीतील आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपन्ना याने रुमानियाच्या फ्लोरिन मर्जिया यांना पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.स्पर्धेतील अव्वल मानांकित जोडी सानिया-हिंगीस यांनी आॅल इंग्लंड क्लबमध्ये नववी मानांकित आॅस्ट्रेलियाची कासी डेलाक्का आणि कझाकिस्तानची यारोस्लावा श्वेडोवा यांच्यावर १ तास १९ मिनिटांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ७-५, ६-३ असा सलग सेटमध्ये विजय मिळवला.सानिया-हिंगीस उपांत्य फेरीत अमेरिकेच्या राकेल कोप्स जोन्स आणि एबीगाली स्पीयर्स या पाचव्या मानांकित जोडीविरुद्ध खेळतील. सानियाने आपली अनुभवी जोडीदार आणि अनुभवी खेळाडू मार्टिना हिंगीस हिच्या साथीने जोरदार कामगिरी करताना सामन्यात एक़ूण ७२ गुण जिंकले. भारतीय-स्विस जोडीने पहिल्या सर्व्हिसवर ६९ टक्के गुण जिंकले आणि तिन्ही ब्रेक पाँइंटचे गुणांत रूपांतर केले. भारतीय खेळाडू सानिया मिर्झा हिने २०११मध्ये एलिना वेस्नीना हिच्या साथीने विम्बल्डनमध्ये उपांत्य फेरी गाठली होती. तर, तिची जोडीदार हिंगीसने १९९६ आणि १९९८ असे दोनदा महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविले आहे.दरम्यान, भारताचा स्टार रोहन बोपन्ना आणि रुमानियाचा फ्लोरिन मर्जिया या जोडीला दुहेरीच्या उपांत्य फेरीत नेदरलँडचा ज्युलियन रॉजर आणि रुमानियाचा होरिया टेकाऊ या जोडीकडून पाच सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर त्यांचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्नही भंगले. ज्युलियन आणि होरिया या जोडीने ३ तास २३ मिनिटे रंगलेल्या रोमहर्षक उपांत्य फेरीत ४-६, ६-२, ६-३, ४-६, १३-११ असा विजय मिळविला. याआधीही बोपन्न २०१३मध्ये पाच सेटपर्यंत चाललेल्या मॅरेथॉन उपांत्य फेरीच्या लढतीत निसटता पराभव पत्करावा लागला होता. योगायोगाने त्या वेळी त्याचा जोडीदार ज्युलियन रॉजर होता. आज ज्युलियन रॉजरने होरियाच्या साथीने बोपन्ना व त्याच्या साथीदाराला पराभूत केले. अखेरचे दोन्ही सेंट धैर्याची परीक्षा घेणारे ठरले. दोघांनी २३ गेमपर्यंत आपली सर्व्हिस वाचवली. पाचव्या सेटच्या २४व्या गेममध्ये भारत-रुमानिया जोडीची सर्व्हिस भेदली गेली आणि त्याचबरोबर त्यांचा या स्पर्धेतील प्रवासही संपला.