शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

सानिया-हिंगीसचा दबदबा कायम

By admin | Updated: January 16, 2016 01:09 IST

सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या दुहेरी जोडीने टेनिस विश्वातील आपला दबदबा सिध्द करताना डब्ल्यूटीए सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला.

सिडनी : सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या दुहेरी जोडीने टेनिस विश्वातील आपला दबदबा सिध्द करताना डब्ल्यूटीए सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला. गतवर्षी विजेतेपदांचा धडाका लावलेल्या या जोडीने या वर्षातील सलग दुसरे विजेतेपद मिळवले. विशेष म्हणजे यासह सानिया - हिंगीस यांनी सलग ३० सामने जिंकण्याचा जागतिक विक्रमही नोंदवला.स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात कडवी झुंज मिळाल्यानंतर विजेतेपदासाठीही सानिया - हिंगीस यांना घाम गाळावा लागला. कॅरोलिन गर्सिया - ख्रिस्टीना मालडेनोविच यांनी लढवय्या खेळ करताना बलाढ्य इंडो - स्विस जोडीला तीन सेटपर्यंत झुंजवले. एक तास १३ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात पहिला सेट ६-१ जिंकून गर्सिया - ख्रिस्टीना यांनी आश्चर्यकारक आघाडी घेतली. पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतर सानिया - हिंगीस यांच्याकडून जबरदस्त पुनरागमनाची अपेक्षा होती. मात्र दुसऱ्या सेटमध्येही ही जोडी १-४ अशी पिछाडीवर पडली. मात्र येथून सानिया - हिंगीस यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर कोणतेही दडपण न घेता ५-५ अशी शानदार बरोबरी केली. यानंतर हा सेट टायब्रेकमध्ये नेत त्यांनी गर्सिया - ख्रिस्टीना यांच्यावर दबाव आणला. यावेळी सानिया - हिंगीस या चॅम्पियन जोडीने निर्णायक सुपर टायब्रेकमध्ये ८-३ अशी बाजी मारत सामना बरोबरीत आणला. तर तिसऱ्या सेटमध्ये सानिया - हिंगीस यांनी दीर्घ अनुभवाच्या जोरावर सुरुवातीपासूनच दमदार खेळ केला आणि गर्सिया - ख्रिस्टीना यांचे कडवे आव्हान परतावले आणि १-६, ७-५, १०-५ असा चमकदार विजय मिळवत आपली विजयी घोडदौड ३० सामन्यांवर नेली. (वृत्तसंस्था)बोपन्ना, मेर्जियाची फायनलमध्ये धडक भारताचा पुरुष दुहेरीतील स्टार रोहन बोपन्नाने रोमानियाचा जोडीदार फ्लोरिन मेर्जियासह सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. विजेतेपदासाठी या जोडीसमोर जेमी मरे आणि ब्रुनो सोरेस यांचे आव्हान असेल. उपांत्य फेरीत या बोपन्ना - मेर्जिया यांनी थॉमस बलुची आणि लियोनार्डो मेयर यांच्यावर ७-६, ६-२ असा विजय मिळवीत अंतिम फेरी गाठली. अन्य उपांत्य लढतीत मरे आणि सोरेस यांनी आपला विजयी धडाका कायम राखताना पोलंडच्या लुकास कुबोट आणि मार्सिन मात्कोवस्की यांचा ७-५, २-६, १०-३ असा पाडाव करुन फायनलमध्ये प्रवेश केला. दरम्यान, बोपन्नाने गतवर्षी कॅनडाच्या डॅनियल नेस्टरसह खेळताना दुहेरीचे जेतेपद मिळविले होते. त्यामुळे रोहनच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल.