शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

सानिया-बोपण्णा विजयी

By admin | Updated: December 8, 2015 02:19 IST

गतविजेत्या इंडियन एसेसने भारताचे सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या खेळाडूंच्या विजयासोबतच आयटीपीएलच्या दुसऱ्या सत्रात दुबई रॉयल्सचा ३०-१८ ने पराभूत केले.

मनिला : गतविजेत्या इंडियन एसेसने भारताचे सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या खेळाडूंच्या विजयासोबतच आयटीपीएलच्या दुसऱ्या सत्रात दुबई रॉयल्सचा ३०-१८ ने पराभूत केले. इंडियन एसेसचा हा विजय नक्कीच विशेष राहिला. संघाने सर्वच सामन्यांत विजय मिळवला. दुहेरीतील जगातील पहिल्या क्रमांकाची खेळाडू सानिया मिर्झा आणि तिचा जोडीदार रोहन बोपण्णाने युएरी रॉयल्सच्या डेनियल नेस्टर आणि क्रिस्टीना म्लादेनोविच यांचा ६-४ असा पराभव केला, तर महिला एकेरीत समांथा स्तोसुर हिने क्रिस्टीना हिचा ६-३ असा पराभव केला. लिजेंड एकेरी सामन्यात फ्रान्सच्या ४२ वर्षांच्या फॅब्रिस सांतोरो याने क्रोएशियाच्या ४४ वर्षांच्या गोरान इवानिसेविकच्या आव्हानाचा पार धुव्वा उडवला. हा सामना ६ -३ असा जिंकला. स्पेनच्या राफेल नदाल आणि इवान डोडिगच्या जोडीने डॅनिएल नेस्टर आणि टॉमस बेर्दिचला ६-३ ने पराभूत करत विजय मिळवला. स्टार खेळाडू नदाल याने पुरुष एकेरीत बेर्दिचला ६-५ ने पराभूत केले. हा सामना नदालने टायब्रेकरमध्ये जिंकला. पुनरागमन करण्यास तयार : सेरेनावर्षाच्या शेवटी यूएस ओपनदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे टेनिसपासून दूर गेलेली सेरेना विल्यम्स पुनरागमनासाठी तयार आहे. सेरेनानेच याबाबतची माहिती दिली.इटलीच्या रॉबर्टा विन्सीसोबत झालेल्या लढतीत सेरेना जखमी झाली होती. त्यानंतर ती खेळापासून दूर गेली. आता ती पूर्णपणे बरी झाली आहे. तसेच व्यावसायिक खेळात पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. सेरेना पुनरागमनानंतर इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीगमध्ये फ्रॅँचायझी संघ फिलिपिन्स मैवरिक्सकडून सहभागी होईल. सेरेना म्हणाली, की ती पुनरागमनामुळे आनंदी असून, लवकर लय परत मिळवेल.’’ २१ ग्रॅण्ड स्लॅम जिंकणाऱ्या सेरेना म्हणाली, की यू. एस.ओपनमध्ये झालेल्या पराभवामुळे कोर्टपासून दूर नव्हते, तर जखमेमुळे दूर राहिले होते. मी सातत्याने खेळत होते. त्यामुळे गुडघ्यात वेदना होत होत्या.