जाकार्ता : भारताची स्टार शटलर सायना नेहवाल हिने आपली चमकदार आगेकूच कायम राखताना इंडोनेशियाच्या ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. स्थानिक खेळाडू फित्रियानी फित्रियानी हिला सरळ दोन गेममध्ये लोळवून सायनाने दिमाखात आगेकूच केली. त्याच वेळी अन्य भारतीय खेळाडूंचे आव्हान मात्र संपुष्टात आले.सायनाने महिला एकेरी गटाच्या दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत ५३व्या स्थानी असलेल्या फित्रियानीला ३२ मिनिटांत २१-११, २१-१० असे सहज लोळवले. यंदा झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही सायनाने फित्रियानीला नमवले होते. पहिल्या गेममध्ये ९-७ अशी आघाडी घेतल्यानंतर सायनाने सलग ५ गुणांसह १४-७ अशी आघाडी घेतली. यानंतर सायनाने आक्रमक खेळ करताना सहजपणे पहिला गेम जिंकला. (वृत्तसंस्था)
सायना उपांत्यपूर्व फेरीत
By admin | Updated: June 3, 2016 02:30 IST