शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
9
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
10
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
11
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
12
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
13
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
14
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
15
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
16
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
17
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
18
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
19
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
20
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO

सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू सज्ज

By admin | Updated: March 28, 2017 01:20 IST

सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू हे भारताचे स्टार शटलर्स आगामी इंडिया ओपन स्पर्धेसाठी सज्ज झाले असून

नवी दिल्ली : सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू हे भारताचे स्टार शटलर्स आगामी इंडिया ओपन स्पर्धेसाठी सज्ज झाले असून, दोघींचेही लक्ष्य विजेतेपदाचे असल्याने या स्पर्धेत बॅडमिंटनप्रेमींना थरारक खेळ पाहण्याची संधी असेल. सातवे सत्र असलेल्या या स्पर्धेत या दोघी आॅलिम्पिक पदकविजेत्या खेळाडू संभाव्य विजेत्या आहेत. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी हीच स्पर्धा जिंकून सायनाने कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थान मिळविले होते. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरून पुनरागमनाच्या प्रयत्नात असलेल्या सायनाने सांगितले, ‘‘दिल्ली नेहमीच माझ्यासाठी विशेष राहिली आहे. येथेच मी राष्ट्रकुल स्पर्धेचे सुवर्णपदक पटकावले होते. यानंतर २०१५मध्ये याच स्पर्धेत बाजी मारून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. ’’सायना पुढे म्हणाली, ‘‘प्रतिस्पर्धी खेळाडू आव्हानात्मक झाले आहेत; पण असे असले तरी सध्या माझा खेळ चांगला होत आहे. आॅल इंग्लंड स्पर्धेतही बरोबरीचा खेळ झाला होता. मी माझा सर्वोत्तम खेळ करेन आणि आशा आहे, की निकाल चांगला लागेल.’’ सायना आणि सिंधू दोघीही आॅल इंग्लंड स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्या होत्या. परंतु, इंडिया ओपनच्या स्पर्धेत या दोघीही उपांत्यपूर्व फेरीत एकमेकींविरुद्ध खेळू शकतात. त्यामुळे, सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धेत सिंधूचा पहिला सामना सिंगापूरच्या शियाओयू लियांगविरुद्ध होणार होता; परंतु लियांगने स्पर्धेतून माघार घेतल्याने सिंधू पहिल्या सामन्यात पात्रता फेरीतून मुख्य फेरी गाठणाऱ्या खेळाडूविरुद्ध खेळेल. त्याच वेळी सायनाचा पहिला सामना चिनी-तैपेईच्या चिया सिन लीविरुद्ध होईल. पुरुष एकेरीत भारताची मदार के. श्रीकांत, बी. साई प्रणीत, समीर वर्मा आणि एच. एस. प्रणय यांच्यावर असेल. (वृत्तसंस्था)