ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. १३ - चायना ओपनच्या स्पर्धेत जपानच्या नोझोमी ओखुराचा २१ - १६, २१ - १३ अशा दोन सरळ सेटमध्ये पराभव करत भारताच्या टॉप सीडेड सायना नेहवालने चायना ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
गेल्या वर्षीही सायनाने महिला एकेरीमध्ये ही स्पर्धा जिंकली असून या वर्षी ती अजिंक्यपद राखते का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सात लाख डॉलर्सच्या चायना ओपन सुपरसीरीज प्रीमियरमध्ये पी. व्ही. सिंधू बाद झाली असून विजेतेपदासाठी सायनाच प्रबळ दावेदार आहे.