जाकार्ता : भारताची स्टार बॅडमिंटन पटू सायना नेहवालने चीनी खेळाडू ताईपे की सू हां चिंग को हिचा तर पुरूष एकेरीत पारुपल्ली कश्यप याने पाचवा मानांकित खेळाडू सोन वान हो यासा सरळ गेममध्ये हरवून इंडोनेशिया ओपन सुपर सिरीजच्या उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला आहे. तर किदाम्बी श्रीकांत याचा पराभव झाला.जागतीक मानांकना तिसऱ्या स्थानी घसरलेली सायना नेहवालने ३६ मिनिटांच्या खेळात चिंग हिला २१-१३, २१-१५ ने हरवले. सायनाचा पुढचा सामना महिला एकेरीत उपांत्यपुर्व फेरीत शिजीयान वँग हिच्याशी होईल.कश्यप याने कोरियाच्या वान हो को याला ३६ मिनिटांच्या खेळात २१-११, २१-१४ ने हरवले. कश्यपचा पुढचा सामना पुरुष एकेरीत अव्वल मानांकित चेन लांग याच्याशी होईल. कश्यपने या सामन्यात ४२ गुण कमावले तर चेन लांगला फक्त २५ गुणांचीच कमाई करता आली. किदाम्बी श्रीकांत याला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. इंडोनेशियाच्या गिटिंग एंथोनी याने १४-२१, २२-२०, २१-१३ ने मात केली. चौथ्या मानांकित श्रीकांतने सुरूवात चांगली केली मात्र त्यानंतर श्रीकांतची लय बिघडली. श्रीकांतने पहिला गेम सहज जिंकला. मात्र दुसऱ्या गेममध्ये एंथोनीने जबरदस्त पुनरागमन केले. त्यानंतर दोन्ही खेळाडूंचे गुण २० -२० असे समान होते. मात्र बिगर मानांकित एथोनीने महत्त्वपुर्ण दोन गुण घेत मॅच निर्णायक तिसऱ्या गेममध्ये नेला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये श्रीकांतची लय बिघडली. आणि त्याचा पराभव झाला. महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनाप्पा यांना सातव्या मानांकित यू यांग आणि झोंग कियांशिन यांच्याकडून २१-८, २१-१८ असा पराभव स्विकारावा लागला.पुरुष दुहेरीतही भारताला पराभव स्विकारावा लागला. प्रणाव जेरी चोपडा आणि अक्षय देवाळकर यांचा पाचव्या मानांकित चाई बियाओ आणि होंग वेइ से यांच्याकडून २१-१३,२१-११ असा पराभव पत्करावा लागला.(वृत्तसंस्था)
सायना, कश्यप उपांत्यपूर्व फेरीत
By admin | Updated: June 5, 2015 01:03 IST