जकार्ता : भारताची स्टार बॅडमिंटन प्लेअर सायना नेहवालने इंडोनेशियन ओपन स्पर्धेची पुढची फेरी गाठली. सायना सोबतच पी.कश्यपनेही पुरुष एकेरीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. मात्र पी. व्ही. सिंधुला पहिल्या फेरीतच बाहेर व्हावे लागले.दुसऱ्या मानांकित सायना नेहवालने थाई प्रतिस्पर्धीला ३५ मिनिटांच्या खेळात २१-१६, २१-१८ ने पराभूत केले. सिंधूची लढत चीनच्या ताईपे के या चिंग सू सोबत होती. चिंगसूने सिंधूला तीन सेट मध्ये २१-१६,१५-२१, १४-२१ असे नमविले.महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी सायनाला चिंगसूशी लढत द्यावी लागणार आहे. पुरूष एकेरीत १४ वा मानांकित खेळाडू पी.कश्यप याने थायलंडच्या तानोंगसाक सेंसोम्बूनसकला २९ व्या मिनिटात २१ -१७,२१-७ ने हरवले. कश्यपचा पुढचा सामना कोरियाच्या वान हो सोनशी होणार आहे.भारताच्या के.श्रीकांतचा सामना डेन्मार्कच्या हंस क्रिस्टियन विटीनशी होईल. महिला दुहेरीत भारतीय जोडी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनाप्पा यांचा सामना चीनच्या ताइपे की या चिंग सू आणि यो पो पाई से यांच्याशी होईल.(वृत्तसंस्था)
सायना, कश्यप पुढच्या फेरीत
By admin | Updated: June 4, 2015 01:20 IST