शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

सचिनचा स्ट्रेट ड्राइव्ह, टीम इंडियावर जळतात परदेशी संघ

By admin | Updated: March 31, 2017 18:34 IST

टीम इंडियाच्या कामगीरीवर परदेशी संघ जळतात असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. 2016-17 च्या सत्रात भारतीय संघाची कामगीरी उल्लेखनीय झाली आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 31 - टीम इंडियाच्या कामगीरीवर परदेशी संघ जळतात. 2016-17 च्या सत्रात भारतीय संघाची कामगीरी उल्लेखनीय झाली आहे. या सत्रात भारताने 13 कसोटी सामन्यापैकी 10 सामने जिंकले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाची कामगिरी उंचावत आहे. न्यूझीलंड , इंग्लंड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया यांचा पराभव केला आहे. 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या गाले कसोटीपासून भारताचा एकही कसोटी पराभव झालेला नाही हे विशेष. असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.सचिनने प्रतिस्पर्धी संघावर बोचरी टीका करत मास्टर स्ट्रोक मारला. पुढे बोलताना तो म्हणला, भारतीय संघ सध्या शक्तीशाली आहे, सर्वच स्थरावर प्रतिस्पर्धी संघापेक्षा आघाडीवर असतो. गोलंदाजी, फलंदाजी बरोबरोरच अष्टपैलू खेळाडूंमुळे भारतीय संघ संतुलित आहे. त्यामुळेच टीम इंडियावर इतर संघ जळतात. भारतीय संघ सध्या परिपक्व आहे. प्रत्येकांनी भारतीय संघाचा खेळ पाहिला असेल. सांघिक कामगिरीच्या जोरावर सध्या क्रमांक एकवर विराजमान आहे.
 
मुंबईत क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये काल "100एमबी" अ‍ॅपचं सचिनच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी तो बोलत होता. क्रिकेटच्या मैदानावर चौकार, षटकारांचे "स्फोट" घडवून शतकांचं शतक करणारा सचिन "मास्टर ब्लास्टर" म्हणून प्रसिद्ध आहे. याच शब्दांची इंग्रजी आद्याक्षरे घेऊन सचिनच्या कार्यकर्तृत्वाला साजेसं असं नाव अ‍ॅपला देण्यात आलं आहे. 27 मार्च रोजी या अ‍ॅपचा व्हिडिओ यू ट्यूबवरही अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओद्वारे सचिननं त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला असून अ‍ॅपच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचं आवाहनही केलं आहे. "सोशल मीडियावर माझ्याबद्दल येणाऱ्या सर्व प्रकारच्या बातम्या व माहिती तुम्हाला या अ‍ॅपमध्ये मिळेल, असं सचिननं म्हटलं आहे. सचिनशी सतत कनेक्ट राहण्यासाठी त्याच्या चाहत्यांना हे अ‍ॅप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.विराट-कोहली आणि स्मिथ यांच्या वादामुळे बॉर्डर-गावस्कर मालिका अधिक चर्चा झाली. दुसऱ्या कसोटीनंतर सुरु झालेला वाद अद्याप थांबलेला दिसत नाही. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी तर विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बालिश, अंहकारी आणि क्लासलेस असल्याची टीका विराटवर ऑस्ट्रेलियन माध्यमांनी केली आहे. सचिनने केलेले कौतुक भारतीय संघासाठी आगामी मालिकेसाठी नक्कीच फायद्याचे ठरेल.