शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

सचिनच्या फलंदाजांना ‘टिप्स’

By admin | Updated: February 12, 2015 02:04 IST

विश्वचषकापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने टीम इंडियातील फलंदाजांना काही विशेष ‘टिप्स’ दिल्या. याशिवाय त्याने आॅस्ट्रेलिया

मेलबोर्न : विश्वचषकापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने टीम इंडियातील फलंदाजांना काही विशेष ‘टिप्स’ दिल्या. याशिवाय त्याने आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंडच्या आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर यश मिळविण्याचा मूलमंत्रही सांगितला.क्रिकेट विश्वातील सर्वाधिक यशस्वी फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिनने १९९९ ते २०११ या दरम्यान तब्बल ६ विश्वचषक खेळले. सचिन पहिल्यांदा १९९२च्या विश्वचषकात खेळला होता. आयसीसीसाठी लिहिलेल्या विश्वचषक स्तंभात सचिन म्हणतो, ‘पर्थ आणि ब्रिस्बेनच्या खेळपट्ट्या वेगवान आणि उसळी घेणाऱ्या आहेत. या खेळपट्ट्यांवर अनुभवहीन फलंदाजांच्या उणिवा चव्हाट्यावर येतील. गोलंदाज आणि फलंदाजांना चुका करण्यास येथे वाव नसतो. फलंदाज जर वेग आणि चेंडूची उसळी समजत असतील तर ते कुठल्याही गोलंदाजावर वर्चस्व गाजवू शकतील.’नोव्हेंबर २०१३मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर करणारा सचिन ‘फलंदाजांनी न्यूझीलंडमध्ये वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांपासून सावध राहावे,’ हे सांगायलादेखील विसरला नाही. तो म्हणाला, ‘‘तेथील वारे इतके जलद असतात, की फलंदाजांना टायमिंगने ‘स्ट्रोक्स’ खेळणेदेखील अवघड होते.’’ विश्वचषकातील ४५ सामन्यांत सर्वाधिक २,२७८ धावा काढणाऱ्या सचिनने २०११च्या स्पर्धेत ९ सामन्यांत ४८२ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडमधील मैदानांचे वैशिष्ट्य सांगताना सचिन लिहितो,‘‘न्यूझीलंडमधील मैदाने पारंपरिक गोल नाहीत. आॅस्ट्रेलियात अ‍ॅडिलेड ओव्हलची सीमारेषा पॉर्इंट आणि स्क्वेअर लेगवर लहान असते. सरळ असलेली सीमारेषा मात्र लांबलचक आहे. पाहुण्या संघांसाठी हे आव्हान असेल. यामुळे फिल्डिंग पोझिशन तसेच गोलंदाजातील डावपेचांवर फरक पडतो. आॅस्ट्रेलियात मोठ्या मैदानांवर सीमारेषादेखील मोठी आहे. १९९९च्या मालिकेत फुल बाऊंड्री होती. मी रिकी पाँटिंगच्या बाऊंड्रीवरून केलेल्या थ्रोवर चौथी धाव घेतली होती. रिकीच्या तगड्या थ्रोनंतरही आम्ही चार धावा घेण्यात यशस्वी ठरलो. चेंडू विकेटकीपरपर्यंत येण्यास वेळ लागतो, याची जाणीव होतीच.’’ खराब फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांसाठी सर्कलमध्ये अतिरिक्त फिल्डर ही एक समस्या असते. ‘स्ट्राईक रोटेट’ करणेदेखील कठीण होऊन बसते. दुसरीकडे, फॉर्ममध्ये असलेले दोन फलंदाज खेळपट्टीवर असतील तर गोलंदाजांवर संकट ओढवते. टीम इंडियाने या बाबी ध्यानात घ्याव्यात, असे सचिनने बजावले आहे. (वृत्तसंस्था)