शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

सचिन क्षमतेने खेळला नाही!

By admin | Updated: October 30, 2015 08:34 IST

अलौकिक फलंदाजीने क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवलेल्या सचिनने आपल्या नावांवर अनेक विक्रम केले असले तरी त्याला द्विशतक किंवा त्रिशतक कसे झळकावले जाते हेच माहीत नव्हते

दुबई : सचिन तेंडुलकर... अलौकिक फलंदाजीने क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवलेल्या विक्रमादित्याने आपल्या नावांवर अनेक विक्रम केले असले तरी त्याला द्विशतक किंवा त्रिशतक कसे झळकावले जाते हेच माहीत नव्हते. तो क्षमतेने खेळलाच नाही असा घणाघाती यॉर्कर विश्वविजयाची चव चाखून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी सचिन तेंडूलकरवर टाकला. माझ्या म्हणण्याचा वेगळा अर्थ काढू नका; मात्र सचिनने स्वत:च्या क्षमतेला योग्य न्याय दिला नाही, असे परखड मत कपिल यांनी व्यक्त केले. दुबईमध्ये शेन वॉर्न, वसीम अक्रम आणि इयान बोथम या माजी दिग्गज क्रिकेटपटूंसह कपिल देव एका कार्यक्रमात हजर होते. या वेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले. सचिनमध्ये जबरदस्त क्षमता होती, असे कपिल देव यांनी सांगितले.सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांवर शतकांचा रतीब घातला. काही द्विशतकी खेळीही साकारल्या; मात्र तो कायमच त्रिशतकापासून दूर राहिला, याविषयी कपिल म्हणाले की, निश्चितच सचिन जबरदस्त खेळाडू होता; मात्र त्याला केवळ शतकच झळकवता येत होते. द्विशतक, त्रिशतक किंवा ४०० धावा कसे झळकवतात, याबाबतीत त्याला माहितीच नव्हती.त्याच वेळी आॅस्टे्रलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्न याने सचिनवर स्तुतिसुमने उधळताना सांगितले की, सचिन शानदार खेळाडू असून मी माझ्या २० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्याचासारखा फलंदाज बघितला नाही. तो गोलंदाजांचा अंदाज बांधून असायचा. नव्वदीच्या दशकात गोलंदाजांवर त्याची दहशत होती. त्याने आॅस्टे्रलियाविरुद्ध शानदार खेळ केला.वकार युनूस आणि मला सचिनविरुद्ध जास्त खेळण्याची संधी न मिळाल्याचे दु:ख आहे. १९८९ साली त्याने पदार्पण करताना आमच्याविरुद्ध सामना खेळला. त्या वेळी तो १६ वर्षांचा होता. १९९९ साली आम्ही त्याच्याविरुद्ध कसोटी खेळलो. तो सर्वश्रेष्ठ फलंदाज होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १०० शतके त्याच्यातील गुणवत्तेची प्रचिती देतात.- वसिम अक्रम, माजी क्रिकेटपटू, पाकिस्तानमाझ्या मते विव रिचडर््स सर्वश्रेष्ठ खेळाडू होते. ज्या वेळी मी खेळण्यास सुरुवात केली, तेव्हा रिचडर््स आणि सुनील गावसकर यांचा काळ होता. त्यानंतर ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकर यांचे आगमन झाले.- इयान बोथम, माजी क्रिकेटपटू, इंग्लंड त्याने आजपर्यंत जे काही साध्य केले त्याहून अधिक यश त्याने मिळवले होते. मात्र तो कायमच मुंबई क्रिकेटपुरता राहिला. मुंबईतील तंत्रशुद्ध क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंऐवजी त्याने विवियन रिचडर््ससोबत जास्त वेळ घालवला पाहिजे होता. - कपिल देव