शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रशियाच्या अ‍ॅथ्लिटस्वर बंदी कायम

By admin | Updated: July 21, 2016 19:41 IST

सरकार पुरस्कृत डोपिंगमध्ये अडकलेल्या रशियातील अ‍ॅथ्लिटस्वर आंतरराष्ट्रीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाने घातलेली बंदी सर्वोच्च क्रीडा लवादाने कायम ठेवल्यामुळे या खेळाडूंच्या आगामी रिओ

क्रीडा लवादाने अपील फेटाळले : रिओ आॅलिम्पिकबाहेर होण्याचे संकटलुसाने : सरकार पुरस्कृत डोपिंगमध्ये अडकलेल्या रशियातील अ‍ॅथ्लिटस्वर आंतरराष्ट्रीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाने घातलेली बंदी सर्वोच्च क्रीडा लवादाने कायम ठेवल्यामुळे या खेळाडूंच्या आगामी रिओ आॅलिम्पिकमधील सहभागावर प्रश्नचिन्ह कायम आहे.रशियाच्या खेळाडूंचे अपील गुरुवारी क्रीडा लवादाने फेटाळून लावले.

प्रतिबंधित सेवनात रशियाचे खेळाडू आघाडीवर असल्याचे आणि त्यांना सरकारचेच प्रोत्साहन असल्याने आयएएफला आढळून आल्यानंतर त्यांच्यावर आॅलिम्पिक अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेत सहभागी होण्याबाबत बंदी घालण्यात आली. या बंदीला रशियन आॅलिम्पिक समिती आणि अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाने क्रीडा लवादात आव्हान दिले होते पण लवादाने ते फेटाळून लावले.क्रीडा लवादाच्या या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती केवळ अ‍ॅथ्लेटिक्समधूनच नव्हे तर संपूर्ण आॅलिम्पिकमधून रशियाला बेदखल करू शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. असे घडल्यास क्रीडा महाशक्ती असलेल्या रशियाची पुरती नाचक्की होईल. यामुळे आॅलिम्पिक आंदोलनाला देखील धक्का बसणार आहे.

१९८० मध्ये अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी मॉस्को आॅलिम्पिकवर बहिष्कार टाकला होता. तत्कालीन सोव्हिएत संघाने नंतर १९८४ च्या लॉस एंजिलिस आॅलिम्पिकवर बहिष्कार टाकला. रशियाच्या सध्याच्या स्थितीमुळे पुन्हा एकदा गोंधळ होण्याची भीती आहे. क्रीडा लवादाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत रशियाच्या अधिकृत प्रवक्त्याने लवादाचा निर्णय निराशादायी असल्याचे सांगितले. आम्ही डोपिंगमुक्त खेळावर भर देत आहोत पण खेळाडूंना आॅलिम्पिकपासून वंचित ठेवणे योग्य नाही. डोपिंगशी ज्यांचा काडीमात्र संबंध नाही, अशा खेळाडूंवर अन्याय होणार आहे.