शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

धावांची विराट लाट...

By admin | Updated: May 19, 2016 05:17 IST

रॉयल चँलेंजर्स बँगलोरने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजीचे अक्षरश: पीसे काढताना १५ षटकात ३ बाद २११ धावांचा हिमालय उभारला

बंगळुरु : तुफान फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीचे झंझावाती शतक आणि विध्वंसक फलंदाज ख्रिस गेलची घणाघाती फलंदाजी या जोरावर रॉयल चँलेंजर्स बँगलोरने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजीचे अक्षरश: पीसे काढताना १५ षटकात ३ बाद २११ धावांचा हिमालय उभारला. या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची १४ षटकात ९ बाद १२० धावा अशी केविलवाणी अवस्था झाल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. यामुळे आरसीबीला डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ८२ धावांनी बाजी मारली.एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पावसाने दमदार हजेरीमुळे सामना प्रत्येकी १५ षटकांचा खेळविण्याचा निर्णय झाला. यानंतर मात्र कोहली व गेल पंजाबवर बरसले. या दोघांच्या बॅटमधून चौकार व षटकारांची बरसात होऊ लागल्यानंतर चेंडू नक्की कुठे टाकायचा असा मोठा प्रश्न पंजाबच्या गोलंदाजांना पडला.गेल - कोहली यांनी केवळ ६६ चेंडूत १४७ धावांची जबरदस्त सालामी देत पंजाबची गोलंदाजी फोडून काढली. गेल षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्याने ३२ चेंडूत ४ चौकार व ८ षटकार ठोकताना ७३ धावा चोपल्या. मात्र कोहलीने आपला दांडपट्टा सुरु करताना पंजाबला सळो की पळो करुन सोडले. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील चौथे शतक ठोकताना कोहलीने केवळ ५० चेंडूत १२ चौकार व ८ षटकार खेचून ११३ धावांचा तडाखा दिला. डिव्हीलियर्सला शून्यावर बाद करण्याचा एकमेव दिलासा पंजाबला मिळाला. यानंतर, अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना दडपणाखाली पंजाबची फलंदाजी कोसळली. युझवेंद्र चहलने (४/२५) अचूक मारा करुन पंजाबच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आणल्या.>विराटने आयपीएलमध्ये ४ हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज.यंदाच्या मोसमात एकूण ७ शतके झाली. स्पर्धा इतिहासात यंदा सर्वाधिक शतके झाली.विराट कोहलीचे चौथे आयपीएल शतक. सर्व शतके यंदाच्याच मोसमातएकाच मोसमात सर्वाधिक शतके झळकावण्याचा कोहलीचा विक्रम>मोक्याच्यावेळी ख्रिस गेल फॉर्मातआयपीएलच्या यंदाच्या मोसमात अडळखती सुरुवात केलेल्या आरसीबीपुढे सर्वात मोठी चिंता होती ती धडाकेबाज ख्रिस गेलच्या हरवलेल्या फॉर्मची. एकीकडे कोहली आणि एबी डिव्हीलियर्स फटकेबाजी करत असताना गेलची बॅट मात्र पुर्णपणे थंडावली होती. त्यातच खराब फॉर्ममुळे कोहलीने त्याली संघाबाहेर बसविण्याचा धाडसी निर्णयही घेतला होता. मात्र कोलकाताविरुध्द काहीप्रमाणात फॉर्ममध्ये आलेल्या गेलने या सामन्यात आपला रुद्रावतार प्रकट करताना पंजाबच्या गोलंदाजांना मजबूत चोपले. यामुळे आरसीबीची फलंदाजी जबरदस्त मजबूत झाली आहे.