शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

धावपटू कविता राऊत अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत; अखेर राज्यपालांचे दरवाजे ठोठावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 07:32 IST

सावरपाड्यातील आदिवासी कन्येने दीड दशकांपासून राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ठसा उमटवला होता.

नाशिक  :  राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकासह थेट ऑलिम्पिकपर्यंत धडक देऊन नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचवणारी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या पदरी शासन दरबारी अद्यापच निराशा पडली आहे. सर्व प्रकारची पात्रता असूनही शासकीय सेवेत प्रथम श्रेणीच्या अधिकारी म्हणून नोकरी दिली जात नसल्याने कविताने अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन तिचे गाऱ्हाणे मांडले. 

सावरपाड्यातील आदिवासी कन्येने दीड दशकांपासून राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ठसा उमटवला होता. २०१० साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत कविताने रौप्य पदकाला गवसणी घातली. त्याबद्दल कविताला खेळाडूंसाठी देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट अर्जुन पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. 

शैक्षणिक क्षेत्रांत इयत्ता पाचवीच्या बालभारतीच्या पुस्तकात धावपटू कविता राऊत यांच्या संघर्षकथेचा प्रवास मांडण्यात आला आहे. २०१४ पासून वर्ग एकच्या पदासाठी शासकीय सेवेत नोकरी मिळावी, म्हणून कविता राऊतने अर्ज केला होता. कवितानंतर अर्ज केलेल्या काही खेळाडूंची वर्ग एकच्या पदावर नियुक्ती झाली. कविताला मात्र, अजूनही नोकरीची प्रतीक्षाच आहे. त्या पार्श्वभूमीवर नोकरीसंदर्भात होत असलेल्या अन्यायाची कैफियत कविता राऊतने राज्यपाल भगतसिंग कोश्यारींपुढे मांडली. 

राज्यपालांना भेटणं हा माझा शेवटचा पर्याय होता. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून माझ्या कामात अडचणी येत आहेत. माझी फाइल तिथून पुढे सरकत नाही. २०१८ मध्ये ज्या ३३ खेळाडूंची यादी निघाली होती, त्यातही माझं नाव नव्हतं. ग्रामीण भागांतील खेळाडूंसाठी मला काम करायचं आहे. - कविता राऊत, आंतरराष्ट्रीय धावपटू

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी