शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
2
Maratha Reservation : मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
3
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले
4
Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
5
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?
6
ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
7
तमिळ सुपरस्टार विशालच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का? १२ वर्षांनी लहान आहे होणारी पत्नी
8
'नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली', पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यावरुन काँग्रेस आक्रमक
9
जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन स्वस्त? जाणून घ्या दोन्ही कंपन्यांचे फायदे आणि किंमत
10
Gauri Pujan 2025: गौराईला नैवेद्य अर्पण करण्याआधी ताटाखाली काढा पाण्याचे मंडल आणि म्हणा 'हा' मंत्र
11
"मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा
12
Mumbai: पर्यावरणपूरक मूर्तीच्या नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनास परवानगी
13
१५ वर्षीय मुलीच्या मागेच लागला साप; १ महिन्यात ६ वेळा चावला, प्रत्येकवेळी पायावर खुणा सोडल्या
14
दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीची मैदानात एन्ट्री; चाहत्यांना सौंदर्याने घायाळ करणारी 'ती' कोण?
15
जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा
16
"आम्ही भेटायला जाणार होतो पण...", प्रियाच्या निधनाबद्दल समजताच उषा नाडकर्णींना अश्रू अनावर
17
Mumbai: धारावीत मैदान, मोकळ्या जागाच नाहीत; खेळायचे कुठे?
18
क्रेडिट कार्ड फक्त पैसेच नाही तर जीवन विमाही मोफत देते; 'या' कार्ड्सवर मिळतो विशेष फायदा
19
हायकोर्टात १० टक्क्यांहून कमी महिला न्यायाधीश, प्रमाण वाढवण्याची मागणी
20
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

रॉयल चॅलेंजर्सची आज अग्निपरीक्षा

By admin | Updated: May 14, 2016 01:57 IST

खराब कामगिरी करीत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आज, शनिवारी आयपीएलमध्ये गुजरात लॉयन्सविरुद्ध ‘करा किंवा मरा’ या इराद्याने झुंज द्यावी लागेल.

बेंगळुरू : खराब कामगिरी करीत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आज, शनिवारी आयपीएलमध्ये गुजरात लॉयन्सविरुद्ध ‘करा किंवा मरा’ या इराद्याने झुंज द्यावी लागेल. गुणतालिकेत सहाव्या स्थानावर असलेल्या बेंगळुरूला प्ले आॅफ खेळण्यासाठी ओळीने चारही सामने जिंकावेच लागतील. कोहलीच्या नेतृत्वाखालील या संघाची आज पहिली परीक्षा असेल. बेंगळुरूचा मागच्या सामन्यात मुंबईकडून आपल्याच मैदानावर पराभव झाला. आजचा सामना गमविला तर प्ले आॅफवर पाणी फेरले जाईल. अशा स्थितीत कोहलीला संघाची नाव पैलतिरी लावायची आहे. ५६८ धावा काढून आॅरेंज कॅपचा मानकरी ठरलेल्या कोहलीची दोन शतके व चार अर्धशतके आहेत. ए बी डिव्हिलियर्सच्या देखील दहा सामन्यांत ४०९ धावा आहेत. के. एल. राहुलने मागच्या सामन्यात ६८ धावा ठोकून आव्हानात्मक धावसंख्या फळ्यावर लावली होती. शेन वॉटसन यानेही अष्टपैलू कामगिरी करीत संघात संतुलन आणले. बेंगळुरूला ख्रिस गेलकडून तुफानी फटकेबाजीची अपेक्षा आहे. कारण या संघाचा मारा कमकुवत आहे. १८० वर धावा केल्यानंतरही त्यांचा पराभव होतो. बेंगळुरूकडून गोलंदाजीत वॉटसन आणि चहल यांचा अपवाद वगळता कुणीही यशस्वी ठरले नाहीत. आयपीएलमध्ये पहिल्यांदा सहभागी झालेल्या गुजरातचीही नजर पहिले स्थान पटकविण्याकडे लागली आहे. गुजरात संघ लय गमावतोे हीच संघाची मोठी चिंता आहे. ब्रँडन मॅक्यूलम, अ‍ॅरोन फिंच, ड्वेन स्मिथ हे तीन फलंदाज अपयशी ठरल्यास पराभवाचा मोठा धोका असतो. गोलंदाजीत ब्राव्होने १२ व धवल कुलकर्णी याने दहा गडी बाद केले. चायनामेन गोलंदाज शिविल कौशिक आणि अनुभवी लेगस्पिनर प्रवीण तांबे यांच्याकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी अद्याप घडायची आहे. (वृत्तसंस्था)> गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैना इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात प्रथमच उद्या येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळू शकणार नसल्याचे प्रशिक्षक ब्रॅड हॉज यांनी सांगितले.रैना खेळणार नसून तो त्याची पत्नी आणि मुलांसोबत आहे. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच रैना एक सामना न खेळण्याची घटना असेल, असे हॉज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.रैनाच्या जागी ब्रॅण्डन मॅक्युलम कर्णधारपद भूषविण्याची शक्यता आहे; परंतु यावर अद्याप निर्णय झाला नाही, असेही हॉज यांनी सांगितले.