शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

रोहितने संधीचा लाभ घ्यावा

By admin | Updated: December 4, 2015 01:20 IST

पहिल्या दिवसाच्या खेळानंतर दक्षिण आफ्रिका संघाला आनंद झाला असेल. कारण कोटलाची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. या खेळपट्टीवर चेंडू वळत आहेत, पण खेळपट्टी थोडी कोरडी आहे.

- वसीम अक्रम लिहितो....

पहिल्या दिवसाच्या खेळानंतर दक्षिण आफ्रिका संघाला आनंद झाला असेल. कारण कोटलाची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. या खेळपट्टीवर चेंडू वळत आहेत, पण खेळपट्टी थोडी कोरडी आहे. भारतीय फलंदाजांनी काही चुकीचे फटके खेळल्याचे दिसून आले. विशेषता रोहित शर्माबाबत मला वाईट वाटले. तो प्रतिभावान क्रिकेटपटू असून अनुभवी आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आठ वर्षांचा अनुभव आहे. कसोटी क्रिकेटमध्ये जर यश मिळत नसेल तर स्मार्ट क्रिकेट खेळण्याची गरज असते. गरज नसताना त्याने अवसानघातकी फटका खेळला. कसोटी क्रिकेटमध्ये छाप सोडण्यासाठी तुम्हाला फार कमी संधी मिळते. रोहितने मिळालेल्या संधीचा लाभ घायला हवा. कर्णधाराने त्याच्यासोबत फटक्याची निवड करण्याबाबत चर्चा करायला हवी. पहिल्या दिवशीच्या खेळात त्याने चुकीचा फटका खेळून विकेट बहाल केली. मी सुद्धा त्याला संघातून वगळले नसते. तो प्रतिभावान असून त्याच्यावर विश्वास दाखविला असता. भारतात खेळाडूंचा मोठा पूल असल्यामुळे रोहितने मिळालेल्या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. वृद्धिमान साहानेही महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती स्वीकारल्यानंतर मिळालेल्या संधीचा लाभ घ्यायला पाहिजे. साहा सध्या भारताच्या विद्यमान यष्टिरक्षकांमध्ये सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे, असे ठामपणे म्हणता येईल. त्याच्यात धावा फटकावण्याची क्षमता आहे. त्याची फलंदाजीची सरासरी ३५ च्या आसपास असायला हवी. त्यासाठी त्याने खेळपट्टीवर अधिक वेळ तळ ठोकायला पाहिजे. त्याने फटक्यांची निवड करताना सावधगिरी बाळगायला हवी. मोर्ने मोर्कलसारख्या विश्व दर्जाच्या गोलंदाजाविरुद्ध मैदानावर पाय ठेवल्याबरोबर फटके मारणे सोपे नसते. चेतेश्वर पुजाराही चांगला खेळाडू आहे. तो एका सरळ येण्याऱ्या चेंडूवर चुकला. अपेक्षेपेक्षा खाली राहिलेला चेंडू बॅट आणि पॅडच्या गॅपमधून गेला. एका चांगल्या सुरुवातीनंतर तो दुर्दैवी ठरला. विराट कोहलीला सूर गवसल्याचे दिसले. त्याने काही शानदार फटके मारले. तो मोठी खेळी करेल, असे वाटत असताना तो बाद झाला. त्यामुळे तो नक्कीच निराश झाला असेल. (टीसीएम)