मुंबई : भारताचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनानंतर आता स्टार फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मादेखील लग्नाच्या बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. रोहितने नुकताच कोणताही गाजावाजा न करता प्रेयसी रितिका सजदेहसोबत साखरपुडा उरकून घेतला. रोहितने आपल्या वाढदिवसाच्या दोन दिवस अगोदर २८ एप्रिलला मुंबईतील बोरीवली स्पोटर््स क्लबमध्ये रितिकाला प्रपोज करून उपस्थित लोकांसमोर तिला अंगठी घातली. रितिका ही मुंबईत वास्तव्यास असून, हे दोघे एकमेकांना सहा वर्षांपासून ओळखत आहेत. ३० एप्रिलला रोहितने आपला २८वा वाढदिवस साजरा केल्यानंतर ट्विटरवर रितिकासोबतचा फोटो शेअर करून ‘चांगल्या मैत्रीनंतर जीवनसाथी बनण्यासारखे अजून चांगले काय असू शकते,’ असा संदेश टाकला होता.विशेष म्हणजे कोणताही गाजावाजा न करता आपल्या जीवनातील नव्या इनिंगची सुरुवात करताना रोहितने रितिकाला प्रपोज करण्यासाठी अशा जागेची निवड केली, जेथे त्याने आपल्या क्रिकेट कारकीर्दची सुरुवात केली होती. बोरीवली स्पोटर््स क्लबच्या मैदानावरच रोहितने वयाच्या ११व्या वर्षी आपला पहिला क्रिकेट सामना खेळला होता. २८ वर्षीय रितिका पेशाने स्पोटस मॅनेजर आहे. त्याच वेळी ती रोहितच्या प्रत्येक सामन्यावर लक्ष देऊन असते. क्रिकेटप्रेमी असलेली रितिका रोहित शर्माची मोठी चाहती आहे.(वृत्तसंस्था)
रोहित शर्माचा साखरपुडा
By admin | Updated: May 4, 2015 00:54 IST