पर्थ : तिरंगी मालिकेत इंग्लंडविरुद्ध शुक्रवारी होणा-या महत्त्वपूर्ण सामन्यात जखमी अनफिट रोहित शर्माला उतरवून कोणतीही रिस्क न घेण्याची भूमिका भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतली आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास होऊ लागला होता. या सामन्यात त्याने १३८ धावांची खेळी केली होती.संघाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले, की भारत जरी अंतिम फेरीत पोहोचला, तरी रोहितची खेळण्याची शक्यता नाही. तो दुखापतीतून सावरत असला, तरी संघ व्यवस्थापन त्याच्या बाबतीत कोणतीच रिस्क घेण्याच्या विचारात नाही. विश्वचषकाला तीन आठवडे उरले असताना असा धोका पत्करणे योग्य होणार नाही, असे संघ व्यवस्थापनाला वाटते. रोहितचे एमआरआय स्कॅन करण्यात आले असून, त्याचा अहवाल पाहून फिजिओने त्याला एक आठवडा विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यानंतर तो सराव सुरू करू शकतो. शिखर धवन सध्या खराब फॉर्ममध्ये असल्याने रोहित संघात असणे अतिशय गरजेचे होऊन बसले आहे.
रोहितची ‘रिस्क’ नाही
By admin | Updated: January 28, 2015 02:08 IST