शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

रिओ तिकीट एक पाऊल दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2016 21:49 IST

राष्ट्रमंडळ क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मनोज कुमार (६४ किलो गट) व सुमीत सांगवान (८१ किलो गट) यांनी जागतिक पात्रता मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

ऑनलाइन लोकमत

अजरबजान, दि. 21 -  राष्ट्रमंडळ क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मनोज कुमार (६४ किलो गट) व सुमीत सांगवान (८१ किलो गट) यांनी जागतिक पात्रता मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. रिओ आॅलिम्पिकचे तिकीट मिळविण्यासाठी त्यांना आता केवळ एका विजयाची आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध महासंघाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. मनोजने बुल्गेरियाच्या इस्मेतोव आयरिन याला २-१ने, तर सुमीतने मंगोलियाच्या संदागसुरेन एरदेनेबयार याच्यावर ३-०ने सहज विजय मिळवित आगेकूच केली. आॅलिम्पिक तिकिटापासून हे दोघे केवळ एक पाऊल मागे आहे. गुरुवारी होणाऱ्या सामन्यात या दोघांनी विजय मिळविल्यास त्यांचा आॅलिम्पिक विजय निश्चित होईल. मंगळवारी मनोजची पहिली लढत झाली. त्यात त्याने बाजी मारली. या पूर्वी झालेल्या पहिल्या फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. याविषयी बोलताना गुरुबक्ष सिंग संधू म्हणाले की, मनोजसाठी हा मोठा सामना होता. त्याचा प्रतिस्पर्धी वेगवान ठोसे मारत होता. त्यातच दुसऱ्या फेरीत प्रतिस्पर्धी आयरिनचा जोरदार ठोसा लागल्याने त्याला काहीशी जखमही झाली होती. त्या स्थितीतही त्याने सामना केला. मध्यंतरी त्याचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत मनोजने बाजी मारली. आता मनोजची पुढील लढत आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या तजाकिस्तानच्या राखिमोव शवकताजोन याच्याशी होईल. शवकताजोन याने अंतिम १६मध्ये झालेल्या लढतीत बहारिनच्या विलियम्स राशिल्ड याला नमविले होते, तर सुमीतची पुढील लढत रशियाच्या पेत्र खामुकोव याच्याशी होईल. खामुकोव याने या पूर्वीच्या सामन्यात स्लोवाकियाच्या डेनिस लेजर याला नमविले होते. या स्पर्धेतून आॅलिम्पिकसाठी ३९ कोटा दिला जाणार आहे. त्यात ४९ किलो गटात दोन, तर ५२, ५६, ६०, ६४, ६९, ७५ व ८१ किलो गटात प्रत्येकी पाच, तर ९१ व त्यापेक्षा अधिक गटासाठी प्रत्येकी एक कोटा आहे. (वृत्तसंस्था)