शिवाजी गोरे
रिओ दी जानेरो, दि. ७ - टेनिस पाठोपाठ टेबल टेनिसमध्येही भारताच्या पदरी निराशा आली. भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलला पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला.
३४ वर्षीय शरथला रोमानियाच्या अॅड्रीयन क्रिसानने संघर्षपूर्ण सामन्यात ८-११, १२-१४,११-९,६-११, ८-११ असे पराभूत केले.
जागतिक क्रमावारीत ७३ व्या स्थानावर असलेल्या शरथने पाच गेमपर्यंत रंगलेल्या या सामन्यात विजयाची शर्थ केली मात्र ३६ वर्षीय क्रिसानने त्याला पराभूत केले. अॅड्रीयन क्रिसान जागतिक क्रमवारीत ९० व्या स्थानावर आहे.