रियो दि जानिरो : पुढील वर्षी ५ आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या आॅलिम्पिकच्या आयोजन खर्चात १० टक्के कपात करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. ब्राझील सध्या आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याने हा निर्णय घ्यावा लागला.दक्षिण अमेरिका खंडात आॅलिम्पिक यजमानपद भूषविणारा पहिला देश असलेल्या ब्राझीलला बेरोजगारी आणि आर्थिक संकटाशी झुंज द्यावी लागत आहे. रियो आयोजनाचे बजेट १ अब्ज ९० कोटी डॉलर इतके आहे. काही गोष्टींत सध्याच्या बजेटपेक्षा ३० टक्के कपात केली जाईल. त्यात प्रिंटर्स आणि प्रिंंटेड साहित्य तसेच माराकाना फुटबॉल स्टेडियममध्ये दुसरा माळा बनविण्याचा प्रस्ताव रद्द करण्याचा समावेश आहे.
रियो आॅलिम्पिक खर्चात १० टक्के कपात
By admin | Updated: October 8, 2015 04:11 IST