शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
4
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
5
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
6
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
7
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
8
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
9
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
10
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
11
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
12
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
13
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
14
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
15
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
16
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
17
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
18
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
19
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
20
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया

REVIEW: सचिनचा चित्रपट म्हणजे चाहत्यांसाठी मेजवानी

By admin | Updated: May 26, 2017 12:59 IST

सचिन तेंडूलकर खेळपट्टीवर एकामागून एक जबरदस्त फटके मारतोय, आणि आपण फक्त त्याला पाहत राहावं असं काहीसं

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - भारतात क्रिकेटचं असलेल वेड याबद्दल नव्याने काही सांगायची गरज नाही आणि त्यातही सचिन तेंडूलकर म्हणजे सर्वांसाठी क्रिकेटमधला देवच. चाहत्यांना प्रतिक्षा लागलेल्या सचिन तेंडूलकरच्या आयुष्यावर आधारित "सचिन..अ बिलिअन ड्रीम्स" चित्रपट आज रिलीज झाला आहे. सचिन तेंडूलकरबद्दल आजपर्यंत लोकांनी इतकं वाचलं, पाहिलं आहे की चित्रपटात काय वेगळं असेल असा प्रश्न पडतो. पण हा चित्रपट म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी मेजवानी आहे. म्हणजे सचिन तेंडूलकर खेळपट्टीवर एकामागून एक जबरदस्त फटके मारतोय, आणि आपण फक्त त्याला पाहत राहावं असं काहीसं. 
 
चित्रपटात सचिनचा बालपणापासूनचा प्रवास दाखवण्यात आला आहे. त्याच्या आयुष्यातील काही खासगी क्षण चित्रपटाच्या निमित्ताने पहायला मिळतात. अर्जून, सारा आणि पत्नी अंजलीसोबत घालवलेले काही खास क्षणही पाहण्याची संधी मिळते. क्रिकेटच्या मैदानावरील सचिन आतापर्यंत आपण पाहिला आहे, पण मैदानाबाहेर खासगी आयुष्यात तो नेमका कसा आहे याचं दर्शनच चित्रपटातून घडतं. सचिनने चित्रपटात सुत्रधाराची भूमिका निभावली आहे. आपल्या प्रवासापासून ते मिळवलेले विजय, पराभव, दुखापत याबद्दल सचिन सांगताना दिसतो. तसंच आपल्याला माहित नसलेल्या अनेक गोष्टींचाही सचिनने उलगडा केला आहे. 
 
1989 मध्ये सचिनने पाकिस्तानविरोधात खेळताना अब्दुल कादिरला लगावलेले ते चार सिक्स पाहताना मजा येते. आजपर्यंत युट्यूबवर अनेकदा तुम्ही पाहिलं असेल, पण थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर पाहताना आपण आपोआप त्यात हरवून जातो. मग ती 1998 मध्ये चेन्नईत शेन वॉर्नला धुतलेली मॅच असो. सचिनने गाठलेली उंची इतकी मोठी आहे की ते सर्वच चित्रपटाच्या माध्यमातून दाखवणं थोडं कठीणच आहे. मात्र तरीही शक्य तितक्या सर्व गोष्टी सामावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 
 
चित्रपटात सचिनचे रेकॉर्ड्स, उपलब्धी दाखवण्यात आलेल्या असल्या तरी वाद टाळण्यात आले आहेत. मॅच फिक्सिंगसारख्या घटना टाळण्यात आल्या आहेत. काही सामन्यांमध्ये सचिनन केलेली खराब कामगिरी वैगरे गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. पण चाहते ही गोष्ट जास्त मनावर घेणार नाहीत. कारण भव्य दिव्य सचिनसमोर हे सर्व विसरायला होईल. 
 
सचिनचे चाहते असाल तर एकदा तरी चित्रपट नक्की पाहा. तुम्हाला येणारा अनुभव असा शब्दांत सांगणं कठीणच. पण पैसा वसूल होईल एवढं मात्र नक्की.