शहरं
Join us  
Trending Stories
1
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
2
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
3
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
4
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
5
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
6
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
7
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
8
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
9
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
10
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
11
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
12
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
13
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
14
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
15
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
17
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
18
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
19
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
20
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन

स्पर्धा आयोजनाची जबाबदारी संघटनांच्या प्रतिनिधींवर महापालिकास्तरीय आंतरशालेय स्पर्धा : क्रीडा समितीच्या बैठकीत निर्णय

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

जळगाव : महापालिकास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास महापालिकेने तयारी दाखवली आहे. त्याबाबत बुधवारी महापालिकेत बैठक पार पडली. त्यात आयोजनाची तयारी करण्यात आली. प्रत्येक स्पर्धेसाठी एका संघटनेच्या पदाधिकार्‍याची किंवा तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. संबधित तज्ज्ञ व्यक्तीला आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून प्रशासकीय मदत मिळेल.

जळगाव : महापालिकास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास महापालिकेने तयारी दाखवली आहे. त्याबाबत बुधवारी महापालिकेत बैठक पार पडली. त्यात आयोजनाची तयारी करण्यात आली. प्रत्येक स्पर्धेसाठी एका संघटनेच्या पदाधिकार्‍याची किंवा तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. संबधित तज्ज्ञ व्यक्तीला आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून प्रशासकीय मदत मिळेल.
महापालिकेच्या सभागृहात बुधवारी दुपारी ही बैठक पार पडली. या बैठकीला महापालिकेचे उपायुक्त प्रदीप जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, नगरसेवक नितीन बरडे, खो - खो मार्गदर्शक गणपतराव पोळ, डॉ.प्रदीप तळवेलकर, महापालिकेचे क्रीडा अधिकारी किरण जावळे, राजेश जाधव, प्रशांत जगताप उपस्थित होते.
महापालिका स्तरीय स्पर्धांचे वेळापत्रक या आधीच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने जाहीर केले होते. त्यानुसार या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धांची ठिकाणेही बदलली जाणार नाहीत. शासन निर्णयानुसार महापालिकेने या स्पर्धेच्या आयोजनाची व खर्चाची जबाबदारी घेतली आहे. त्यात आयोजन करणार्‍या संघटनेच्या प्रतिनिधींनी एका आठवड्याच्या आत महापालिकेला क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा संपूर्ण खर्च सादर करावा, असे नितीन बरडे यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर ज्या स्पर्धा घेण्याचे बाकी आहे, अशा स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी तज्ज्ञ व्यक्तींवर देण्यात आली. जिम्नॅस्टिक,तायक्वांदो, विनु मंकड क्रिकेट स्पर्धा यांची जबाबदारी प्रा.श्रीकृष्ण बेलोकर यांच्याकडे देण्यात आली आहे. वेट लिफ्टींग व पॉवर लिफ्टींगची जबाबादारी सचिन महाजन यांच्याकडे देण्यात आली आहे.
महापालिका स्पर्धांसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने क्रीडा संकूल वापरासाठीची फी कमी करावी, अशी मागणी नितीन बरडे यांनी क्रीडा अधिकार्‍यांकडे केली. त्यावर क्रीडा अधिकारी पाटील यांनीही संकुलाची पाणी प˜ी आणि करात सुट द्या, असे वक्तव्य करताच सभागृहात हशा पिकला.

इन्फो-
खेळाडूंना भत्ता देण्याची मागणी
आतंरशालेय क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हाभरातून खेळाडू येतात. शहराबाहेरील स्पर्धेसाठी शाळांनी १५० रुपये प्रति खेळाडू भत्ता द्यावा, तसेच शहरातील शाळांनी ७५ रुपये प्रती खेळाडू भत्ता द्यावा, अशी मागणी प्रदीप तळवेलकर यांनी केली. तसेच याबाबत शासनाचे परिपत्रक आहे. त्यानुसार शाळांना जिल्हा क्रीडा अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी पत्र देण्याची मागणीही तळवेलकर यांनी केली.