शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

देशाचे प्रतिनिधित्व करणे अभिमानाची बाब

By admin | Updated: February 21, 2015 02:30 IST

माझ्या मते १०-१२ दिवसांपूर्वी पाकिस्तानी तंबूत काही समस्या निर्माण झाल्या असण्याची शक्यता आहे. काही सीनिअर खेळाडू व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ग्रँट लुडेन यांच्यादरम्यान वाद झाल्याचे वृत्त आले होते.

माझ्या मते १०-१२ दिवसांपूर्वी पाकिस्तानी तंबूत काही समस्या निर्माण झाल्या असण्याची शक्यता आहे. काही सीनिअर खेळाडू व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ग्रँट लुडेन यांच्यादरम्यान वाद झाल्याचे वृत्त आले होते. पण, त्यानंतर या सर्व अडचणी सोडविण्यात यश आले. ही बाब आता समोर आल्यामुळे याची सांगड भारताविरुद्धच्या पराभवासोबत घालण्यात येत आहे; पण असे काहीच नाही, याची मी हमी देतो. माझा एकेकाळचा सहकारी वकार संघाचा मुख्य प्रशिक्षक असून, त्याच्याकडे जोखिमीचे काम आहे. संघाला पुन्हा विजयपथावर आणण्यासाठी त्याला काही योजना आखावी लागणार आहे, पण खेळाडूंनीही काही रणनीती तयार करणे आवश्यक आहे. तुम्ही प्रत्येक वेळी प्रशिक्षकावर विसंबून राहू शकत नाही; कारण संघातील खेळाडू काही १५ वर्षांची मुले नाहीत.संघातील खेळाडूंसाठी १०.३० च्या आता घरात, ही योजना माझ्या आकलनापल्याड आहे. आपण २१ व्या शतकात वावरत असताना खेळाडूंवर कर्फ्यू लावणे चुकीचे आहे. इम्रान खान कर्णधार असताना आम्हाला कधीच अशा समस्येला सामोरे जावे लागले नाही. पाक संघाला आता वेस्ट इंडीजच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. विंडीजविरुद्ध आयर्लंड संघाने ३०० पेक्षा अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केलेला आहे. जेसन होल्डरला कुठल्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे, याची मला चांगली कल्पना आहे. २४ व्या वर्षी कर्णधारपदाची जबाबदारी आणि सीनिअर खेळाडूंचे समर्थन नसणे, अशी परिस्थिती मी अनुभवली आहे. विंडीजचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा खेळाडू जगातील लीगमध्ये खेळण्यास प्राधान्य देत आहेत. विंडीज निवड समितीने ड्वेन ब्राव्हो व किरोन पोलार्ड यांच्यासारख्या दोन दिग्गज खेळाडूंना बाहेरचा मार्ग दाखविला आहे. त्यामुळे संघाच्या निराशाजनक कामगिरीचा मार्ग निवड समितीनेच निश्चित केल्याचे दिसून येते. विंडीज बोर्डाने बीसीसीआयच्या सहमतीने आयपीएलबाबत काही योजना तयार करणे आवश्यक आहे. दोन वर्षांपर्यंत विंडीजच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान देण्यात येऊ नये, असे विंडीज बोर्डाने बीसीसीआयला सांगायला हवे. त्यानंतर खेळाडूंचे वर्तन बघायला हवे. देशाचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा दुसरी कुठली बाब महत्त्वाची नाही. पाकिस्तानतर्फे क्रिकेट खेळल्यामुळे मला जगात ओळख निर्माण करता आली. सचिन आज जे काही आहे ते केवळ भारतातर्फे क्रिकेट खेळल्यामुळे आहे. भारतीय संघाचा विचार करता आठवड्याअखेर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. अनेक जाणकार दक्षिण आफ्रिका संघाला विजयाचा दावेदार मानत आहे; पण माझ्या मते ही लढत चुरशीची होईल. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध भारतीय संघाला योजनाबद्ध फलंदाजी करावी लागेल. सलामीवीरांवर चांगली सुरुवात करण्याची जबाबदारी राहणार आहे. १० षटकांत त्यांनी गडी न गमावता ४० धावाही फटकावल्या तरी ती वाईट कामगिरी ठरणार नाही. सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली तर धोनी व रैना यांना अखेर आक्रमक खेळी करण्याची संधी राहील. सलामीवीरांना कसोटीप्रमाणे सावध फलंदाजी करावी लागेल. भारतीय संघाला काही अडचण भासत असेल तर त्यांनी झिम्बाब्वेविरुद्धची लढत बघावी. झिम्बाब्वेने त्या लढतीत सुरुवातीला दक्षिण आफ्रिका संघावर वर्चस्व गाजवले होते. ही लढत सर्वंच संघांसाठी प्रेरणादायी ठरेल. दक्षिण आफ्रिका संघ बलाढ्य आहे; पण अपराजित नाही, हे झिम्बाब्वे संघाने सिद्ध केले आहे. (टीसीएम)