शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

बॉक्सिंगमध्ये पुनरागमन हा पुनर्जन्म - जितेंदर

By admin | Updated: October 28, 2016 01:22 IST

बॉक्सिंगमध्ये पुनरागमन करणे कधीही सोपे नसते; पण व्यावसायिक बॉक्सिंगमधील पदार्पण हा स्वत:चा पुनर्जन्म मानतो, असे स्टार बॉक्सर जितेंदरचे मत आहे. जितेंदर

नवी दिल्ली : बॉक्सिंगमध्ये पुनरागमन करणे कधीही सोपे नसते; पण व्यावसायिक बॉक्सिंगमधील पदार्पण हा स्वत:चा पुनर्जन्म मानतो, असे स्टार बॉक्सर जितेंदरचे मत आहे. जितेंदर हा हरियाणा पोलीसमध्ये उपअधीक्षकपदावर कार्यरत आहे.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २००६मध्ये कांस्यविजेता असलेल्या जितेंदरने आयओएससोबत गुरुवारी करार केला. ही कंपनी आशिया व्यावसायिक बॉक्सिंग चॅम्पियन विजेंदरचीदेखील प्रमोटर आहे. भिवानीचा रहिवासी असलेला जितेंदर म्हणाला, ‘‘माझ्यासाठी बॉक्सिंग रिंकमधील पुनरागमन पुनर्जन्मासारखेच आहे. माझे मेंटर अखिलकुमार यांचे प्रयत्न तसेच विजेंदरसिंग याच्या प्रेरणेमुळे हे शक्य होऊ शकले.’’२८ वर्षांच्या जितेंदरची नियुक्ती सध्या पंचकुला येथे झाली आहे. तो म्हणाला, ‘‘पोलिसाची नोकरी माझे आवडते क्षेत्र आहे. मधुबनी येथे प्रशिक्षणादरम्यान मी गुन्हेगारी कायद्याचा अभ्यास केला; पण बॉक्सिंगपासून कधीही दूर झालो नाही. बीजिंगपाठोपाठ मी २००९च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले. त्यानंतर विश्व बॉक्सिंग सिरीजमध्ये २०११मध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत डोळ्याच्या वरच्या भागाला जखम झाल्याने माघार घ्यावी लागली होती. चुकीच्या वेळी जखम झाल्याने बाहेर पडावे लागले. शिवाय, फ्लायवेटमधून बँटमवेटमध्ये यावे लागले. यामुळे मेंटर अखिलकुमारच्याच गटात खेळण्याची वेळ आली होती. २०१०च्या आशियाई स्पर्धेसाठी निवड न झाल्याने बॉक्सिंगमधून माझा इंटरेस्ट कमी झाला होता; पण हरियाणा पोलीसमध्ये असताना पुन्हा एकदा खेळाकडे वळलो आहे.’’ जितेंदर डिसेंबर महिन्यात व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये प्रवेश करणार आहे. (वृत्तसंस्था)