शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

आॅलिम्पिक उद्घाटन सोहळ्याचा बेरंग करण्यासाठी निदर्शक सज्ज

By admin | Updated: August 5, 2016 20:32 IST

ब्राझीलच्या रियो दी जेनेरो येथे ३१ व्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचा बेरंग करण्यासाठी निदर्शकांनी कंबर कसली आहे

ऑनलाइन लोकमतरिओ दी जेनेरो, दि. ५ : ब्राझीलच्या रियो दी जेनेरो येथे ३१ व्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचा बेरंग करण्यासाठी निदर्शकांनी कंबर कसली आहे. देशातील विद्यमान राजकीय संकट आणि आर्थिक मंदीच्या विरोधात आपला आवाज बुलंद करून जगाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्याची निदर्शकांची योजना आहे.

दक्षिण अमेरिकेत होणाऱ्या पहिल्या आॅलिम्पिक खेळाचा उद्घाटन सोहळा मारकना स्टेडियममध्ये होणार असून, तेथे ५0 हजारांपेक्षा जास्त प्रेक्षक आणि सहभागी होणारे ११ हजार खेळाडूंसह विविध देशातील राष्ट्राध्यक्ष स्टेडियममध्ये उपस्थित असणार आहेत. या रंगारंग सोहळ्याकडे जगभरातील क्रीडा रसिकांचे लक्ष असणार आहे; परंतु दुसरीकडे ब्राझीलमध्ये असंतोषी गटासाठीदेखील आपला विरोध मोठ्या व्यासपीठावर व्यापक प्रमाणात दर्शविण्याची एक मोठी संधी असणार आहे.

हॉटेल कोपाकबानाच्या बाहेर सकाळी आणि पुन्हा माराकाना स्टेडियमबाहेर विरोध दर्शविण्याची निदर्शकांची योजना आहे. माराकाना स्टेडियममध्ये आॅलिम्पिक मशालने ज्योत प्रज्वलित करताच स्पर्धेची सुरुवात होणार आहे.त्याआधी निदर्शकांनी आॅलिम्पिक मशाल रिलेदरम्यानही विविध ठिकाणी विरोध दर्शविला. त्यामुळे दंगलविरोधी पोलिसांसोबत त्यांची झटापटदेखील झाली. याशिवाय निदर्शकांनी उद्घाटन सोहळ्यादरम्यान कार्यवाहक राष्ट्रपती माईकल तेमेर यांच्याविरुद्ध संताप व्यक्त करण्याचीदेखील धमकी दिली आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या चोख बंदोबस्तामुळे निदर्शनकाऱ्यांची संख्या काही हजारांपर्यंतच असेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे; परंतु निदर्शकांच्या विरोधामुळे खेळातील या महाकुंभाच्या आयोजनाचा बेरंग होण्याची शक्यता आहे.

ब्राझीलचे एक स्थानिक पत्रकार आणि निदर्शनकारी मॅन्युएला त्रिनिदादे यांनी तर आॅलिम्पिक खेळ हे देशासाठी मोठी आपत्ती असल्याचे म्हटले आहे. आम्ही आमचा राग तेमेर यांच्याविरुद्ध दाखवणार आहोत. आम्ही त्यांना सत्तेबाहेर पाहू इच्छितो. ते एक जखमेप्रमाणे आहेत. जनता अशा सरकारला स्वीकारू नये, अशी आमची इच्छा आहे, असे त्यांनी म्हटले.दरम्यान, ब्राझीलच्या प्रसिद्धीमाध्यमांनुसार अधिकारी राष्ट्रपती तेमेर यांचे उद्घाटन सोहळ्यातील भाषण संक्षिप्त ठेवण्याची योजना बनवीत आहेत. ज्यामुळे लोकांना त्यांचा विरोध करण्याची जास्त संधी मिळणार नाही. त्याचबरोबर निदर्शकांचा आवाज जोरदार संगीतात दबून जाईल, असे आयोजकांना वाटते. तेमेर यांनीदेखील निदर्शकांच्या हुटिंगसाठी आपण तयार असल्यचे सांगितले.