शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

मार्श बंधू इतिहास नोंदविण्यास सज्ज

By admin | Updated: December 17, 2014 01:34 IST

आॅस्ट्रेलियाचे मार्श बंधू शॉन व मिशेल बुधवारी भारतीय दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी मैदानावर उतरतील त्यावेळी त्यांची आॅस्ट्रेलियातर्फे एकाच कसोटी

ब्रिसबेन : आॅस्ट्रेलियाचे मार्श बंधू शॉन व मिशेल बुधवारी भारतीय दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी मैदानावर उतरतील त्यावेळी त्यांची आॅस्ट्रेलियातर्फे एकाच कसोटी सामन्यात खेळणाऱ्या बंधूंच्या यादीमध्ये नोंद होईल. फेब्रुवारी महिन्यापासून कसोटी संघातून बाहेर असलेल्या ३१ वर्षीय शॉन मार्शला दुखापतग्रस्त कर्णधार मायकल क्लार्कच्या जागी संघात स्थान मिळाले आहे, तर आॅक्टोबरमध्ये पदार्पणाची कसोटी खेळणारा तेवीस वर्षीय मिशेल बुधवारी कारकिर्दीतील चौथा कसोटी सामना खेळणार आहे.ही परंपरा १८७७ मध्ये आॅस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यापासून प्रारंभ झाली. त्यावेळी डेव व नेड ग्रेगरी हे खेळले होते. त्यानंतर १९७० च्या दशकात इयान व ग्रेग चॅपेल या प्रसिद्ध जोडीने ४३ सामने एकत्र खेळले. दोघांनी कर्णधारपदही भूषविले होते. आॅस्ट्रलियातर्फे सोबत खेळणाऱ्या बंधूंमध्ये सर्वांत मोठी जोडीमध्ये स्टीव्ह व मार्क वॉ यांचा क्रमांक लागतो. त्यांनी २००२ मध्ये १०८ व्या कसोटी सामन्यांतील अखेरची लढत खेळली होती. मार्श बंधूंचे पिता ज्योफ मार्श यांनी सलामीवीर म्हणून आॅस्ट्रेलियातर्फे ५० सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी राष्ट्रीय प्रशिक्षक व निवड समिती सदस्य म्हणूनही भूमिका बजाविली आहे. दोन शतके झळकाविणाऱ्या शॉनने त्याचा लहान बंधू अष्टपैलू मिशेल मार्शच्या साथीने खेळणार असल्यामुळे आनंद व्यक्त केला. शॉन म्हणाला, आम्ही प्रदीर्घ कालावधीपासून ज्या दिवसाची प्रतीक्षा करीत होतो, अखेर तो दिवस आला आहे. आम्ही या कसोटी सामन्याबाबत उत्सुक आहोत. (वृत्तसंस्था)