मुंबई : मी अपक्ष म्हणून चार वर्षांपुर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) निवडणूक अपक्ष म्हणून लढलो आणि त्यावेळी उपाध्यक्ष म्हणून निवडूणही आलो. परंतु यावेळी एमसीएचा ढिसाळ कारभार पाहून मी मागील निवडणूकीमध्ये क्रिकेट फर्स्ट पॅनलची स्थापना केली. यंदा १७ जूनला रंगणाऱ्या निवडणूकीसाठी आम्ही सज्ज असून क्रिकेट फर्स्ट पॅनलला शिवसेनेने पठिंबा दिल्याने आमचा आत्मविश्वास दुणावला आहे, असे डॉ. विजय पाटील यांनी सांगितले.देशांतर्गत क्रिकेट मधील सर्वात प्रतिष्ठेची असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. या निवडणूकीमध्ये एमसीएचे विद्यमान उपाध्यक्ष पाटील यांचे क्रिकेट फर्स्ट पॅनेल पुर्ण तयारीने उतरले आहे. पुणे माझी जन्मभूमी आहे, तर ठाणे माझी कर्मभूमी आहे असे सांगतानाच पाटील म्हणाले की, गेल्या निवडणूकीमध्ये क्रिकेट फर्स्ट पॅनलचे माझ्यासह लालचंद राजपूत, संजय पाटील, अॅल्बी कुरविल्ला आणि नदीम मेमन असे पाच उमेदवार कार्यकारिणी समितीवर निवडून आलेलो होतो. दरम्यान शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्याविषयी पाटील यांनी सांगितले की, डॉ. डी. वाय .पाटील आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री होती. हीच मैत्री आता मी आणि उध्दव ठाकरे कायम राखणार आहोत. तसेच, विक्रमी ४० वेळा रणजी ट्रॉफी पटकावून राष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा राखणाऱ्या मुंबईचा इतिहास नवोदितांना कळावा यासाठी क्रिकेट म्झुझियमची संकल्पना देखील पाटील यांनी यावेळी मांडली. च्अॅल्बी कुरविल्ला, लालचंद राजपूत, संजय पाटील, नदीम मेमन, राजन फातरफेकर, खा. राहूल शेवाळे, आ. प्रताप सरनाईक, मयांक खांडवाला, डॉ. उन्मेश खानविलकर, इक्बाल शेख, दाऊद पटेल, दीपक जाधव, कौशिक गोडबोले, संगम लाड, आशिष पाटणकर, सुरज समत, जी. पी. गावंडे आणि प्रवीण आमरे.
एमसीए निवडणुकीसाठी सज्ज
By admin | Updated: June 5, 2015 01:28 IST