शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

मेस्सीसोबत अर्जेंटिना बोस्रियासाठी सज्ज

By admin | Updated: June 15, 2014 03:12 IST

लियोनेल मेस्सी आकर्षण असलेला अर्जेंटिनाचा संघ विश्वचषकाचा पहिला सामना रविवारी ‘क’ गटात बोस्रिया-हर्जेगोविनाविरुद्ध खेळणार आहे.

रियो दी जेनेरियो : लियोनेल मेस्सी आकर्षण असलेला अर्जेंटिनाचा संघ विश्वचषकाचा पहिला सामना रविवारी ‘क’ गटात बोस्रिया-हर्जेगोविनाविरुद्ध खेळणार आहे. बार्सिलोनाच्या २६ वर्षांच्या मेस्सीने गेल्या काही वर्षांत अनेक सन्मान मिळविले आहेत. पण, फुटबॉलच्या महाकुंभात त्याची कामगिरी फारशी चमकदार झालेली नाही. २००८ साली बीजिंगमध्ये आॅलिम्पिक सुवर्ण विजेत्या अर्जेंटिना संघाचा मेस्सी सदस्य होता, पण विश्वचषक आणि कोपा-अमेरिका चषक जिंकण्याचे भाग्य मिळाले नाही. चार वेळेचा बॅलन डिओर पुरस्कार आणि बार्सिलोना संघासोबत तीन वेळा युरोपियन चॅम्पियन बनलेल्या मेस्सीच्या खेळावर कुणी शंका घेण्याचे कारण नाही़ पण, अर्जेंटिनासाठी कामगिरी करीत नसल्याने त्याच्याकडे संशयाने पाहिले जाते. २००६ आणि २०१० च्या विश्वचषकात मेस्सीने काही केले नव्हते, पण २०१४ चा विश्वचषक मेस्सीच्या नावे असू शकतो. २००६ मध्ये १८ वर्षांच्या मेस्सीने सर्बिया-मोंटेनिग्रोविरुद्ध एकमेव गोल केला. २०१० मध्ये साढू दिहगो मॅरेडोना संघाचा प्रशिक्षक होता. त्याने ४-१-३-२ या डावपेचांतर्गत संघ उतरविल्याने मेस्सी दबावात आला होता. या वेळी कोच अलेक्झांड्रो साबेला यांनी मेस्सीला चांगली कामगिरी करता यावी, यासाठी सावधपणे संघ निवडला. साबेला यांनी मेस्सीला आघाडीला गांजोला हिगूएन आणि सर्जियो एगुहरो यांच्यासोबत स्थान दिले. चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये सामनावीर ठरलेला रियल माद्रिदचा अँजेल डी मारिया मिडफिल्डमध्ये सावध असेल. मेस्सीला प्रतिस्पर्धी बचावफळीने बांधून ठेवू नये, याची काळजी मारिया घेईल. अर्जेंटिना संघ ‘वन मॅन’ आर्मी असल्याचा ठपका कोचने खोडून काढला.