शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

वाचा 2018 मध्ये क्रीडा जगतात काय काय विशेष? चाहत्यांना मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 18:49 IST

2017 ला निरोप देताना आणि 2018 चे स्वागत करताना क्रीडाजगतावर नजर टाकल्यास येणारे वर्ष हे विश्वचषक, आॅलिम्पिक, राष्ट्रकुल आणि एशियाड अशा 'मेगा इव्हेंट'चे असल्याचे दिसून येईल.

ललित झांबरे

मुंबई - 2017 ला निरोप देताना आणि 2018 चे स्वागत करताना क्रीडाजगतावर नजर टाकल्यास येणारे वर्ष हे विश्वचषक, आॅलिम्पिक, राष्ट्रकुल आणि एशियाड अशा 'मेगा इव्हेंट'चे असल्याचे दिसून येईल.2018 चे मुख्य आकर्षण असेल ती रशियातील फुटबॉलची विश्वचषक स्पर्धा मात्र त्याशिवाय दक्षिण कोरियात होणारे हिवाळी आॅलिम्पिक व हिवाळी पॅरालिम्पिक, आॅस्ट्रेलियात होणारे राष्ट्रकुल सामने, इंडोनेशियात होणारे एशियाड सामने, लंडनमध्ये होणारा टेबल टेनिसचासांघिक विश्वचषक, बर्मिंगहममध्ये होणारा जिम्नॅस्टिक्सचा विश्वचषक, लंडनमध्ये होणारी महिलांची आणि भारतात होणारी पुरुषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा आणि विंडीजमध्ये होणारा महिलांचा क्रिकेट टी-20 विश्वचषक आणि न्यूझीलंडमध्ये वर्षाच्या सुरुवातीलाच खेळली जाणारी 19 वर्षाआतील विश्वचषक स्पर्धा क्रीडाप्रेमींच्या कलेंडरमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवतील.वर्षाच्या सुरुवातीलाच 13 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यान न्यूझीलंडमध्ये 19 वर्षाआतील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. फेब्रुवारीत 9 ते 25 तारखेदरम्यान दक्षिण कोरियातील प्योंगचांग येथे हिवाळी आॅलिम्पिक होईल. त्याच ठिकाणी 9 ते 18 मार्चदरम्यान हिवाळी पॅरालिम्पिकच्या स्पर्धा रंगतील.फेब्रुवारीमध्येच 22 ते 25 तारखेदरम्यान लंडनमध्ये टेबल टेनिसची सांघिक विश्वचषक स्पर्धा होईल.21 व 22 मार्चला इंग्लंडमधल्या बर्मिंगहम येथे जिम्नॅस्टिक्सच्या विश्वचषक स्पर्धेत चित्तथरारक कसरती डोळ्यांचे पारणे फेडतील. त्यापाठोपाठ आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे 4 ते 15 एप्रिलदरम्यान राष्ट्रकूल सामने होणार आहेत. यात भारतीय खेळाडू पदकांची लयलूट करतील अशी अपेक्षा आहे.यानंतर येईल ती क्रीडाविश्वातील सर्वात मोठी स्पर्धा, 'फुटबॉलचा विश्वचषक'. रशियात 14 जून ते 15 जुलैदरम्यान या स्पर्धेनिमित्ताने सहभागी 32 देशांशिवाय सारे जग फुटबॉलमय झालेले बघायला मिळेल.यंदा हॉकीतील पुरुष व महिला अशा दोन्ही विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. महिलांची विश्वचषक स्पर्धा 21 जुलै ते 5 आॅगस्टदरम्यान लंडनमध्ये खेळली जाणार आहे तर पुरुषांची विश्वचषक स्पर्धा 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान भारतात नियोजित आहे.हिवाळी आॅलिम्पिक व राष्ट्रकूलनंतर 2018 मध्ये आणखी एक बहुविध खेळांची बहुराष्ट्रीय स्पर्धा होणार आहे ती म्हणजे 2018 चे आशियायी क्रीडा सामने (एशियाड). इंडोनेशियातील जाकार्ता व पलेम्बांग येथे 18 आॅगस्ट ते 2 सप्टेंबर या काळात या स्पर्धा होणार आहेत. आशियाडच्या इतिहासात प्रथमच दोन शहरांना मिळालेले संयुक्त यजमानपद हे यावेळेचे वैशिष्टय.इकडे आशियाई सुपरपॉवरचा फैसला इंडोनेशियात होत असताना तिकडे त्याआधी युरोपमध्ये 1 ते 12 आॅगस्टदरम्यान झालेल्या युरोपियन स्पोर्टस चॅम्पियनशीपमध्ये युरोपियन सुपर पॉवरचा फैसला झालेला असेल. ग्लासगो आणि बर्लिन येथे नौकानयन, सायकलिंग, जिम्नॅस्टिक्स, जलक्रीडा, अ‍ॅथलेटिक्स आणि ट्रायथलॉन या क्रीडाप्रकारातल्या स्पर्धा होणार आहेत.क्रिकेटची वषार्तील दुसरी विश्वचषक स्पर्धा वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात वेस्टइंडिजमध्ये खेळली जाईल. महिला क्रिकेटची ही टी-20 विश्वचषक स्पर्धा असेल. यावेळी भारतीय महिला विश्वविजेतेपद आणतील काय, हे पाहणे मनोरंजक ठरेल.याशिवाय 2018 मधील विशेष बाब ठरेल ती म्हणजे आयर्लंडच्या संघाला मिळणार असलेला कसोटी क्रिकेटचा दर्जा. आपला पहिला अधिकृत कसोटी सामना ते 11 ते 15 मे दरम्यान पाकिस्तानविरुध्द मलाहिदे येथे खेळतील.

2018 मधील इतर प्रमुख क्रीडा स्पर्धा अशा..

  • 2 ते 4 मार्च- वर्ल्ड इनडोअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप, बर्मिंघम
  • 21 एप्रिल ते 7 मे- स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशीप, शेफिल्ड
  • 26 ते 29 एप्रिल- ज्युदोची युरोपियन चॅम्पियनशीप, तेल अविव्ह
  • 29 एप्रिल ते 6 मे- टेबल टेनिस वर्ल्ड चॅम्पियनशीप, हल्मस्टाड, स्वीडन
  • 19 मे- फुटबॉल एफ.ए. कप फायनल, वेम्बली
  • 26 मे- फुटबॉल , चॅम्पियन्स लीग फायनल, कीव्ह, युक्रेन
  • 14 ते 17 जून- कराटे वर्ल्ड चॅम्पियनशीप, डुंडी
  • 30 जुलै ते 5 आॅगस्ट - बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशीप, नानजिंग, चीन
  • 30 जुलै ते 12 आॅगस्ट - शिडाच्या नुकांची जागतिक स्पर्धा, आरहूस, डेन्मार्क
  • 31 जुलै ते 5 आॅगस्ट- तायक्वोंदो वर्ल्ड चॅम्पियनशीप, ब्युनोस आयर्स
  • 23 ते 26 आॅगस्ट- कनोईंग स्प्रिंट वर्ल्ड चॅम्पियनशीप , पोतुर्गाल
  • 6ते 16 सप्टेंबर - क्लायम्बिंग वर्ल्ड चॅम्पियनशीप , इन्सब्रूक, आॅस्ट्रिया
  • 9 ते 16 सप्टेंबर - नौकानयन वर्ल्ड चॅम्पियनशीप , बल्गेरिया
  • 16 ते 23 सप्टेंबर - ज्युदो वर्ल्ड चॅम्पियनशीप, बाकू, अझरबैजान
  • 28 ते 30 सप्टेंबर - गोल्फ रायडर कप, फ्रान्स
  • 25 आॅक्टोबर ते 3 नोव्हेंबर - जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅम्पियनशीप , दोहा
  • 10 ते 11नोव्हेबर- टेनिस फेडरेशन कप फायनल
  • 12 ते 18 नोव्हेंबर - टेनिस एटीपी फायनल्स
  • 23 ते 25 नोव्हेंबर - टेनिस डेव्हिस कप फायनल