(वाचली) ... राजस्थान येथील स्केटिंग स्पर्धेत चिंचोलीकर, रेपे यांचे यश
By admin | Updated: November 1, 2014 23:14 IST
कोल्हापूर : राजस्थान (गोठण) येथे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या सी.बी.एस.ई.वेस्ट झोन स्केटिंग स्पर्धेत कोल्हापूरच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या शैलेश चिंचोलीकर व प्रणव रेपे यांनी कांस्यपदक पटकावले.
(वाचली) ... राजस्थान येथील स्केटिंग स्पर्धेत चिंचोलीकर, रेपे यांचे यश
कोल्हापूर : राजस्थान (गोठण) येथे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या सी.बी.एस.ई.वेस्ट झोन स्केटिंग स्पर्धेत कोल्हापूरच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या शैलेश चिंचोलीकर व प्रणव रेपे यांनी कांस्यपदक पटकावले. दहा वर्षांखालील इनलाईन रिंग-२ प्रकारांत प्रणव रेपे याने, तर १२ वर्षांखालील क्वॉड स्केटिंग व रोडरेस या प्रकारांत शैलेश चिंचोलीकर याने कांस्यपदक पटकावले. स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरांचल या राज्यांतून १७०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. या यशस्वी खेळाडूंना प्राचार्य लुईस रॉड्रिग्ज, स्केटिंग प्रशिक्षक सचिन इंगवले, श्रद्धा टोपकर, संजय चिले यांचे मार्गदर्शन लाभले. -------फोटो : ०१११२०१४ कोल- प्रणव रेपेफोटो : ०१११२०१४ कोल- यश चिंचोलीकर