शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

आरसीबीपदाचा राजीनामा नाही देणार : पटेल

By admin | Updated: November 16, 2015 02:44 IST

नुकताच मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट’ नियम लागू करण्याचा निर्णय घेतला.

बंगळुरू : नुकताच मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट’ नियम लागू करण्याचा निर्णय घेतला. यानुसार बीसीसीआयमध्ये कार्यरत असलेला अधिकारी किंवा त्याचा जवळचा नातेवाईक आयपीएल फ्रँचाईजीद्वारे आर्थिक लाभ घेणारा नसावा. मात्र अजूनही काही अधिकारी आयपीएलमध्ये कार्यरत असल्याचे समोर येत आहे. यामध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत ते ब्रिजेश पटेल. पटेल कर्नाटक राज्य क्रिकेट संघाचे (केएससीए) सचिव असून आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) फ्रँचाईजीचे क्रिकेट संचालनप्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत.भारताचे माजी लेगस्पिनर नरेंद्र हिरवाणी यांनी नुकताच आपला मुलगा मध्य प्रदेश संघाकडून देशांतर्गत स्पर्धेत खेळत असल्याने मध्य प्रदेशच्या वरिष्ठ निवड समितीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र सध्या पटेल यांच्याकडून अशी कोणतीही हालचाल दिसत नाही. आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेपासूनच पटेल आरसीबीच्या संचालन मंडळात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे आरसीबीच्या संकेतस्थळावर अजूनही पटेल यांच्या नावापुढे क्रिकेट संचालनप्रमुख असे पद दिसून येते.दरम्यान, याबाबतीत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की पटेल यांचे म्हणणे आहे, की त्यांचे केएससीएमधील पद हे मानद आहे. (वृत्तसंस्था)