शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

रवींद्र जडेजाची द्वितीय स्थानी झेप, आश्विनचे अव्वलस्थान कायम

By admin | Updated: December 22, 2016 00:34 IST

भारताचे दोन गोलंदाज रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा हे आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल दोन स्थानावर आले आहेत.

दुबई : भारताचे दोन गोलंदाज रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा हे आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल दोन स्थानावर आले आहेत. त्यात डावखुरा रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीत प्रथमच एकूण १० बळी घेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. जडेजाला या कामगिरीने ६६ गुण मिळाले आहेत. त्यामुळे तो अव्वलस्थानी कायम असणाऱ्या आॅफस्पिनर आश्विनपासून फक्त आठ गुणांनी दूर आहे.भारतीय दोन गोलंदाज गोलंदाजी क्रमवारीत असण्याची ही दुसरीच वेळ आहे. याआधी डावखुरा फिरकी गोलंदाज बिशनसिंह बेदी आणि लेगस्पिनर बी. चंद्रशेखर हे १९७४ मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर होते.पाचव्या कसोटीत एकूण १५४ धावांत १0 बळी घेणाऱ्या जडेजाने पाच सामन्यांच्या मालिकेत २६ गडी बाद केले आहेत, तर आश्विने २८ विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. या कामगिरीमुळे भारताने इंग्लंडविरुद्ध ४-0 अशी कसोटी मालिका जिंकली. या कामगिरीमुळे जडेजाने जोश हेजलवूड, जेम्स अँडरसन, डेल स्टेन आणि रंगना हेराथ यांना मागे टाकले आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही जडेजा तिसऱ्या, तर आश्विन अव्वल स्थानावर आहे. दरम्यान, भारतीय वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा २३व्या स्थानावर पोहोचला आहे.कसोटी फलंदाजांच्या यादीत भारताचा लोकेश राहुल आणि करुण नायर यांना मोठा फायदा झाला आहे. १९९ धावांच्या खेळीमुळे राहुलला २९ स्थानांचा लाभ होऊन तो कारकिर्दीतील सर्वोत्तम अशा ५१ व्या रँकिंगवर पोहोचला आहे, तर नायरला त्याच्या तिसऱ्या कसोटीतील ३0३ धावांच्या खेळी १२२ स्थानांचा लाभ होऊन तो ५५ व्या स्थानी पोहोचला.मंगळवारी भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका जिंकून वर्षाची अखेर नंबर वन स्थानाने केली आहे. या मालिकेतील विजयाने भारताला पाच स्थानांचा फायदा झाला आहे आणि आता ते २0१६ च्या अंतिम कसोटी रँकिंग अपडेटमध्ये टीम १२0 गुणांवर पोहोचले आहेत. भारत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या आॅस्ट्रेलियापेक्षा १५ गुणांनी पुढे आहे. (वृत्तसंस्था)

विदेशातील चोकर्सचा डाग पुुसायचाय : जडेजाभारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीचा वर्षाअखेरीस शानदार समारोप करीत विदेशात भारतीय संघ कचखावू सिद्ध होतो, हा डाग आगामी २०१७ मध्ये पुसून काढण्याचा संकल्प अष्टपैलू रवींद्र जडेजा याने सोडला आहे.चेन्नईत पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत जडेजाने दुसऱ्या डावात ४८ धावा देत सात इंग्लिश फलंदाजांना बाद केले. एकापाठोपाठ एक मालिका जिंकल्यामुळे भारतीय संघासाठी मावळते वर्ष फारच चांगले राहिल्याचे जडेजा म्हणाला.भारताने यंदा ११ कसोटी सामने खेळले आणि ८ जिंकले. या आधी २०१० मध्ये भारताने कॅलेंडर वर्षांत सर्वाधिक १४ सामने खेळले होते. त्यातील आठ जिंकले,तीन हरले आणि तीन सामने अनिर्णीत राहिले होते. संघातील खेळाडूंचा फिटनेस चांगला असल्यामुळेच यंदा आम्ही यशस्वी कामगिरी करू शकलो. आमचे खेळाडू फिट असून, मैदान आणि जीममध्ये बराच वेळ घालवीत असल्याचा हा परिणाम आहे, असे त्याने आवर्जून सांगितले. मी आणि माझा संघ जगभरात पसरलेल्या आमच्या चाहत्यांना शब्द देतो की, ‘विदेशात खराब कामगिरी करणारा संघ हा ‘टॅग’ पुसून काढू.- रवींद्र जडेजा