शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सचिनच्या सेल्फी व्हिडिओत रणवीर सिंग

By admin | Updated: April 5, 2017 13:43 IST

मास्टर ब्लास्टर सचिन सध्या त्याच्या मोबाईल अॅपच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनसाठी तो सध्या बऱ्याच ठिकाणी भेट देत आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 5 - मास्टर ब्लास्टर सचिन सध्या त्याच्या मोबाईल अॅपच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनसाठी तो सध्या बऱ्याच ठिकाणी भेट देत आहे. सचिन तेंडुलकरचा बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंग सोबतचा सेल्फी व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होताना दिसतोय. सचिन तेंडुलकरने काल हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. यामध्ये रणवीर आणि सचिन दोघांचाही अंदाज पाहण्यासारखा आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये "100एमबी" अ‍ॅपचं सचिनच्या हस्ते अनावरण करण्यात आल होतं.  
सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रणवीर 100 एमबी अॅप बद्दल माहिती सांगताना दिसतोय. अॅपमध्ये तुम्हाला काय काय मिळेल हे त्यांने सांगितले आहे. तसेच ते डाऊनलोड करण्याचं आवाहनही रणवीरने केले आहे. काही दिवसापुर्वी सचिन आणि गायक सोनू निगम यांचा गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रकराच्या चर्चा झाल्या होत्या.  
 
क्रिकेटच्या मैदानावर चौकार, षटकारांचे "स्फोट" घडवून शतकांचं शतक करणारा सचिन "मास्टर ब्लास्टर" म्हणून प्रसिद्ध आहे. याच शब्दांची इंग्रजी आद्याक्षरे घेऊन सचिनच्या कार्यकर्तृत्वाला साजेसं असं नाव अ‍ॅपला देण्यात आलं आहे. 27 मार्च रोजी या अ‍ॅपचा व्हिडिओ यू ट्यूबवरही अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओद्वारे सचिननं त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला असून अ‍ॅपच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचं आवाहनही केलं आहे. "सोशल मीडियावर माझ्याबद्दल येणाऱ्या सर्व प्रकारच्या बातम्या व माहिती तुम्हाला या अ‍ॅपमध्ये मिळेल, असं सचिननं म्हटलं आहे. सचिनशी सतत कनेक्ट राहण्यासाठी त्याच्या चाहत्यांना हे अ‍ॅप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
 
सचिन लवकरच आपल्याला सिनेमागृहातही दिसणार आहे. 26 मे रोजी सचिन तेंडुलकरचा बायोपिक असलेला चित्रपट रिलीज होत आहे.