शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

रणजी ‘रन’संग्राम' , ४१व्यांदा चषकावर नाव कोरण्यास मुंबई सज्ज

By admin | Updated: February 24, 2016 18:40 IST

रणजी स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मुंबईने रणजी सामन्यात्या पहिल्याच दिवशी सौराष्ट्रावर आघाडी मिळवत ४१ व्या रणजी चषकावर नाव

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २४ -  रणजी स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मुंबईने रणजी सामन्याच्या अंतिम सामन्यातील पहिल्याच दिवशी सौराष्ट्रावर आघाडी मिळवत ४१ व्या रणची चषकावर नाव कोरण्याची तयारी केली आहे.  मुंबईने नानेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजानी अचूक ठरवला. 
पहिल्याच दिवशी मुंबईच्या गोलंदाजानी सौराष्ट्रावर मात केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी  ८४.४ षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात १९२ धावा सौराष्ट्राने बनवल्या आहेत.
सौराष्ट्राकडून सर्वाधिक अर्पित वासवदा याने ७७ धावांचे योगदान दिले. कर्णधार जयदेव शहा १३, अवि बारोत १४,  अनुभवी चेतेश्वर पुजारा ४, चिराग जानी १३ धावांचे योगदान दिले आहे. प्रेरक मनजाद  धावावर खेळत आहे. उद्या सकाळच्या सत्रात झटपट २ फलंदाज बाद करुन मुंबईचे फलंदाजीला येतील. मुंबईला आघाडी घेण्याची चांगली संधी आली आहे. मुंबईकडून कुलकर्णीने ४ फलंदाजानां तंबूचा रस्ता दाखवला.  ठाकूरने २, नायर आणि साधूने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.
 
दोन्ही संघात विजेतेपदासाठी पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर लढत सुरु  आहे. हा ‘रन’संग्राम कोण जिंकेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईचा संघ ४५ व्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. मुंबईने ४० वेळा रणजी चषक पटकावला आहे. सौराष्ट्राचा संघ दुसऱ्यांचा अंतिम फेरीत स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. 
हे दोन्ही संघ २०१२-१३ मध्ये अंतिम फेरीत समोरासमोर आले होते. त्यात मुंबईने सौराष्ट्रला एक डाव व १२५ धावांनी पराभूत करीत ४० वा किताब नावावर केला होता.
 
 रणजीच्या ८२ वर्षांच्या इतिहासात मुंबईने ४० वेळा किताब नावावर केला आहे. चार वेळा ते उपविजेते राहिले आहेत. मुंबई १९९१ नंतर खेळलेल्या दहा अंतिम सामन्यांत एकदाही हरलेली नाही. मुंबईची मदार ही फलंदाजांवर असेल. श्रेयस
प्रतिस्पर्धी संघ - 
मुंबई : आदित्य तारे (कर्णधार-यष्टीरक्षक), सुर्यकुमार यादव, अभिषेक नायर, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, निखिल पाटील, शार्दुल ठाकुर, सिद्धेश लाड, धवल कुलकर्णी, विशाल दाभोलकर, इक्बाल अब्दुल्ला, बद्रे आलम, भाविन ठक्कर, सुफियान शेख, बलविंदर सिंग संधु.
सौराष्ट्र : जयदेव शहा (कर्णधार), शेल्डन जॅक्सन, अवि बारोत, चेतेश्वर पुजारा, चिराग जानी, जयदेव उनादकट, प्रेरक मनजाद, कमलेश मकवाना, धर्मेंद्रसिंह जडेजा, वंदित जीवराजानी, अर्पित वासवदा, दिपक पुनिया, हार्दिक राठोड, मोहसिन दोडिया, सागर जोगियानी (यष्टीरक्षक).