शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नेमबाजी संघ निवड प्रक्रियेत हेराफेरी - राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 05:07 IST

१६ वर्षांचा आशियाई सुवर्ण विजेता सौरभ चौधरी याला वर्षभर राष्ट्रीय संघातून बाहेर बसावे लागले,’ असा दावा ज्युनियर राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक जसपाल राणा यांनी केला आहे.

नवी दिल्ली : ‘मर्जीतील खेळाडूला लाभ पोहोचविण्यासाठी निवड प्रक्रियेत मनमानी बदल केल्यामुळे १६ वर्षांचा आशियाई सुवर्ण विजेता सौरभ चौधरी याला वर्षभर राष्ट्रीय संघातून बाहेर बसावे लागले,’ असा दावा ज्युनियर राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक जसपाल राणा यांनी केला आहे.सौरभ हा मेरठजवळच्या कलिना गावातील शेतकरी कुटुंबातील आहे. त्याने इंडोनेशियात नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेकवेळा आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियन राहीलेल्या नेमबाजांना मागे टाकून सुवर्ण जिंकले. आशियाई स्पर्धेत देशासाठी सर्वांत लहान वयाचा तो सुवर्ण विजेता बनला.माजी नेमबाज जसपाल म्हणाले, ‘एनआरएआयमधील (राष्टÑीय रायफल महासंघ) काही प्रभावशाली व्यक्तींनी स्वार्थासाठी निवड धोरणात बदल केल्यामुळे सौरभला वर्षभर बाहेर रहावे लागले.’ जसपाल पुढे म्हणाले, ‘सिनियर गटातही सौरभ देशाचा आघाडीचा नेमबाज होता.तो जितू रायच्या तुलनेत सरस होता.‘ग्रिप’योग्य नसल्याचे कारण देत एका स्पर्धेत सौरभला अपात्र ठरविण्यात आले. या प्रकरणी मला दखल द्यावी लागली. काही कोचेससोबत बोलणे झाल्यानंतर त्याची अपात्रता रद्द ठरविण्यात आली.’आशियाई स्पर्धेच्या चाचणीतही सौरभने जितूपेक्षा अधिक गुणांची कमाई केली होती. विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्य विजेत्या जितूला ‘आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्ट’चे आर्थिक पाठबळ मिळाले आहे. खेळाडूंचे ‘टॅलेंट’ पैसा आणि प्रभाव या गोष्टींच्या आड दडपले जावू नये, असे माझे ठाम मत असल्याचे जसपाल म्हणाले. (वृत्तसंस्था)>युवा नेमबाजांना बराच पल्ला गाठायचा आहे. यश- अपयश, कटू अनुभव यातून जाताना युवा नेमबाज आणखी भक्कम होतील, असा विश्वास व्यक्त करीत राणा यांनी नेमबाजांच्या पालकांना खेळासाठी प्रोत्साहन देणे कायम ठेवावे, असे आवाहन केले. जसपाल यांनी मनू भाकर, अनीश भानवाला आणि सौरभ चौधरीसारख्या युवा नेमबाजांना विश्व स्तरावर पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.