शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

राजेशचा चमकदार खेळ

By admin | Updated: November 21, 2015 01:22 IST

द्वितीय मानांकित आणि नॅशनल ‘बी’ विजेता फिडे मास्टर अविनाश आवटेला अखिल महाराष्ट्र फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत १६व्या मानांकित राजेश गुप्ता विरुद्ध

मुंबई : द्वितीय मानांकित आणि नॅशनल ‘बी’ विजेता फिडे मास्टर अविनाश आवटेला अखिल महाराष्ट्र फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत १६व्या मानांकित राजेश गुप्ता विरुद्ध बरोबरी मान्य करावी लागली. या अनपेक्षित निकालामुळे अविनाश इतर अव्वल खेळाडूंच्या तुलनेत पिछाडीवर पडला. त्याचवेळी अग्रमानांकित इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी, चिराग साटकर, केतन बोरीचा आणि राजाबाबू गजेंगी या अव्वल खेळाडूंनी आपल्या सर्व लढती जिंकून प्रत्येकी ४ गुणांसह संयुक्तरीत्या अग्रस्थान पटकावले आहे.बोरीवली येथील डॉन बॉस्को शाळेमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत राजेश गुप्ताने (इलो १६८५) चमकदार खेळ करताना कसलेल्या अविनाश आवटेला (इलो २१३५) बरोबरी मान्य करण्यास भाग पाडले. दमदार सुरुवात केलेल्या आवटेला मध्यांतराला गुप्ताने चांगलेच कोंडीत पकडले. बोर्डाच्या मध्यावरच भक्कम संरक्षणाचे जाळे तयार करताना गुप्ताने आवटेला आक्रमणाची फारशी संधी न देता बरोबरी मान्य करण्यास भाग पाडले. यासह दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी अर्धा गुणाची कमाई केली. दुसऱ्या बाजूला अन्य एका अटीतटीच्या लढतीत मुक्तेश राघवन (इलो १५८०) याने चमकदार खेळ करताना आपल्याहून बलाढ्य असलेल्या शुभम् कुमठेकर (इलो १९४५) बरोबरीत रोखले. तसेच अंकित भट्टाचार्यने (इलो १४४७) अनपेक्षित निकाल लावताना वेदान्त पानेसरला (इलो १८४९) पराभूत करण्याची कामगिरी केली.ंआठ खेळाडू संयुक्तरीत्या द्वितीय स्थानीस्पर्धेत अव्वल खेळाडू प्रत्येकी ४ गुणांसह संयुक्तरीत्या अग्रस्थानी असून, त्यांच्याहून अर्धा गुणांनी एकूण आठ खेळाडू संयुक्तरीत्या द्वितीय स्थानी विराजमान आहेत. यामध्ये फिडे मास्टर अविनाश आवटे, अमरदीप बारटक्के, प्रतीक शेनवी, राजेश गुप्ता, रवींद्र नरगुंडकर, अंकित भट्टाचार्य, यश कपाडी आणि आदित्य बांदेकर यांचा समावेश आहे.