राजेंद्र हायस्कूल विजेता
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
व्हीसीए १५ वर्षे गट क्रिकेट
राजेंद्र हायस्कूल विजेता
व्हीसीए १५ वर्षे गट क्रिकेटराजेंद्र हायस्कूल विजेतानागपूर : यश कदमच्या अष्टपैलू कामगिरीच्या (११३ धावा, ५ बळी )बळावर राजेंद्र हायस्कूलने सेंटर पॉईंट काटोल रोड संघाचा ५४ धावांनी पराभव करीत व्हीसीएद्वारा आयोजित १५ वर्षे गटाची क्रिकेट स्पर्धा जिंकली. सिव्हील लाईन्स स्टेडियममध्ये हा सामना खेळविण्यात आला.राजेंद्र हायस्कूलने ५० षटकांत ५ गडी गमावून २८२ धावा उभारल्या. यश कदमने ११ चौकारांसह ११३ धावा ठोकल्या. सिद्धेश दंडेवार याने दहा चौकारांसह ८४ धावांचे योगदान दिले. पमसाद मानकर याने अर्धशतकी खेळी केली. सीपीएसकडून आयुष अग्रवाल याने दोन गडी बाद केले.सीपीएसचा डाव ४८.२ षटकांत २२८ धावांत संपुष्टात आला. कर्णधार पराग तोतलाच्या ९३ धावा व्यर्थ गेल्या. धैर्य आहुजाने ५७ धावा केल्या. यश कदमने ३४ धावांत अर्धा संघ बाद केला तर मानेकरने दोन बळी घेतले.(क्रीडा प्रतिनिधी)