शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानचा विजयी ‘चौकार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2015 01:19 IST

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अत्यंत रंगतदार सामन्यात जेम्स फॉल्कनरने निर्णायक चौकार मारुन राजस्थान रॉयल्सला सनराइजर्स हैदराबादविरुध्द ६ विकेट्सने विजयी केले.

विशाखापट्टणम : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अत्यंत रंगतदार सामन्यात जेम्स फॉल्कनरने निर्णायक चौकार मारुन राजस्थान रॉयल्सला सनराइजर्स हैदराबादविरुध्द ६ विकेट्सने विजयी केले. सलग चौथ्या विजयासह राजस्थानने विजयी ‘चौकार’ मारत गुणतालिकेत ८ गुणांसह आपले अव्वल स्थान आणखी मजबूत केले. हैदराबादने दिलेले १२८ धावांचे आव्हान ४ फलंदाजांच्या मोबदल्यात पार करताना राजस्थानने १३१ धावा फटकावल्या.सलामीवीर अजिंक्य रहाणेची जबाबदारीपूर्वक खेळी (६२) आणि संजू सॅमसनने(२६) त्याला दिलेली उपयुक्त साथ या जोरावर राजस्थानने सावध परंतु भक्कम सुरुवात केली. रहाणे - सॅमसन यांनी १०.२ षटकांत ६४ धावांची जबरदस्त सलामी देत राजस्थानच्या विजयाचा पाया रचला.रवी बोपाराने सॅमसनला बाद करुन ही जोडी फोडली. सॅमसनने ३० चेंडूत २ चौकारांसह २६ धावांची संयमी खेळी खेळली. यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ (१३) फारशी चमक न दाखवता कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि लगेच करुण नायर देखील एक धाव काढून बाद झाल्याने राजस्थानची १ बाद ६४ वरुन ३ बाद ९१ अशी घसरगुंडी उडाली.मात्र एका बाजूने खंबीरपणे उभा असलेला रहाणे हैदराबदच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत होता. त्याने ४६ चेंडूंत अर्धशतक पुर्ण केल्यानंतर वेग वाढवला. रहाणे विजयाची औपचारिकता पूर्ण करणार असे दिसत असतानाच टे्रंट बोल्टने रहाणेची यष्टी उखडली. यानंतर बोल्ट आणि प्रवीण कुमार यांनी टिच्चून मारा करताना फॉल्कनर आणि स्टुअर्ट बिन्नी यांना जखडवून ठेवले. अखेरच्या षटकात राजस्थानला विजयासाठी ७ धावांची गरज असताना प्रवीणकुमारने अप्रतिम मारा करत सामना एक चेंडू एक धाव अशा रोमांचक स्थितीत आणला. या दडपणाच्या स्थितीत अनुभवी फॉल्कनरने शेवटच्या चेंडूवर निर्णायक चौकार मारुन राजस्थानचा सलग चौथा विजय साकारला.तत्पूर्वी धवल कुलकर्णी, प्रवीण तांबे यांच्यासह सर्वच गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने सनराइजर्स हैदराबादला ५ बाद १२७ असे रोखले. नाणेफेक जिंकून राजस्थान संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय धवल कुलकर्णीने सार्थ ठरविला. त्याने शिखर धवनला १० धावांवर झेलबाद केले. नंतर डेव्हिड वॉर्नर २१ धावा काढून अजिंक्य रहाणेच्या अचूक थ्रोवर धावबाद झाला. सहाव्या षटकात धवलने लोकेश राहुलला २ धावांवर पायचीत करून सनराइजर्सला तिसरा धक्का देऊन ३ बाद ४५ अशी अवस्था केली. यावेळी यष्टीरक्षक नमन ओझा आणि इयान मोर्गन यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. दरम्यान फॉल्कनरच्या गोलंदाजीवर ओझा बाद झाला होता, परंतु तो नोबॉल ठरला. ही जोडी राजस्थानसाठी डोकेदुखी ठरत असताना प्रवीण तांबेने ओझाचा (२५) त्रिफळा उडविला. पुढच्या षटकांत मोर्गनही तांबेची शिकार बनला. तांबेला रिव्हर्स स्वीप मारताना तो पायचित झाला. मोर्गनने ३0 चेंडूत २७ धावा केल्या. राजस्थानच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केल्याने हैदराबादला चांगली कामगिरी करता आली नाही. (वृत्तसंस्था)धावफलक सनराइजर्स : डेव्हिड वॉर्नर धावबाद (रहाणे) २१, शिखर धवन झे. सॅमसन गो. कुलकर्णी १०, लोकेश राहुल पायचीत गो. कुलकर्णी २, नमन ओझा त्रि. गो. तांबे २५, इयान मॉर्गन पायचीत गो. तांबे २७, रवी बोपारा नाबाद २३, आशिष रेड्डी नाबाद १३; अवांतर : ६; एकूण : ५ बाद १२७; गोलंदाजी : टीम साऊदी ४-०-३०-०, ख्रिस मॉरिस ३-०-२३-०, दीपक हुडा २-०-११-०, धवल कुलकर्णी ३-१-९-२, जेपी फॉल्कनर २-०-२०-०, स्टुअर्ट बिन्नी २-०-१२-०, प्रवीण तांबे ४-०-२१-२.राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे त्रि. गो. बोल्ट ६२, संजू सॅमसन झे. ओझा गो. बोपारा २६, स्टीव्हन स्मिथ झे. वॉर्नर गो. शर्मा १३, करुण नायर झे. व गो. बोपारा १, स्टुअर्ट बिन्नी नाबाद १६, जेपी फॉल्कनर नाबाद ६; अवांतर : ७; एकूण : ४ बाद १३१; गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ४-०-२५-०, ट्रेंट बोल्ट ४-०-३१-१, प्रवीण कुमार ४-०-३०-०, कर्ण शर्मा ३-०-१९-१, रवी बोपारा ४-०-१८-२, आशिष रेड्डी १-०-५-०.